शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्राबाहेर लागली चक्क चपलांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 12:18 IST

Washim News : रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : येथील लसीकरण केंद्रावर सध्या पात्र असलेल्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. दरम्यान, एकाचवेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने टोकन पद्धत अंगीकारण्यात आली आहे. दुसरीकडे १६ मे रोजी दुसरा डोस घ्यायला आलेल्या नागरिकांनी उभे राहून पाय दुखवून घेण्यापेक्षा उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार घेतला. याचवेळी रांगेतून नंबर कटू नये, यासाठी चक्क चपलांचीच रांग लावण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.कामरगाव येथे फेब्रुवारी महिण्यापासून कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असून कोरोनाने मृत्यूचे प्रमाणही गेल्या काही दिवसांत वाढले आहे. परिणामी, कोरोनाविषयी नागरिकांच्या मनात आता मोठी दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, १६ मे पासून कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात डोस घेण्याकरिता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय अधिकरी डाॅ माधव ढोपरे यांनी लसीकरणासाठी आलेल्या नाागरिकांना निर्धारित वेळेचे कुपन देऊन गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.१६ मे रोजी लसीकरण केंद्रावर लसीचा दुसरा डोस मिळणार असल्याची माहिती मिळाल्याने नागरिकांनी सकाळपासून केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. दुपारच्या सुमारास उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी काही लोकांनी रांगेत चपला ठेवून झाडाच्या सावलीचा आधार घेतल्याचेही पाहावयास मिळाले. 

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यताकामरगाव येथे १६ मे पासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. या अंतर्गत लसीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या ४५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. पहिल्याच दिवशी गावातील पात्र नागरिकांनी लस घेण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस