शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 11:20 IST

Mucomycosis in Washim district : एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला आहे.

वाशिम :  पोस्ट कोविडनंतर जिल्ह्यातही म्युकरमायकोसिसचे (बुरशीजन्य आजार) २६ रुग्ण आढळून आले होते. गत १५ दिवसापासून जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळला नसल्याने जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला आहे.दुसऱ्या लाटेत कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा आजार आढळून आला. हा आजार बुरशी (फंगल इन्फेक्शन) या जंतूंमुळे होतो. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराने ११ मे रोजी पहिला बळी घेतला होता. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती काही कारणाने कमी झालेली असेल, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल तर त्यांच्यामध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. कोरोनानंतर डोळा, दात, मुख, तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, सायनस रक्त संचय, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्याच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे आदी लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात एकूण २६ रुग्ण आढळून आले. त्यात चार जणांचा मृत्यू झाला हाेता.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २६ रुग्ण आढळले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. गत १५ दिवसांपासून म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या तरी जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त आहे. - डॉ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMucormycosisम्युकोरमायकोसिस