शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही - डाॅ. विजय जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 15:34 IST

Vijay Jadhav interview राज्य शासन पुरस्कार प्राप्त डाॅ. विजय जाधव यांची मुलाखत.

वाशिम : येथील राजस्थान महाविदयालयातील प्रा. डाॅ. विजय जाधव यांना त्यांच्या अस्वस्थ तांडा या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाला. जिल्हयात आधी साहित्यिक ना.च. कांबळे यांना पदमश्री तर जाधव यांच्या कथासंग्रहास राज्य पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांची घेतलेली मुलाखतआपणास मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल ?माझ्या "अस्वस्थ तांडा" या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कार योजने अंतर्गत शासकीय प्रथम प्रकाशन लघुकथेसाठी दिला जाणारा ग. ल. ठोकळ पुरस्कार मिळाल्याने निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.     या पुरस्कारापर्यत मला ग्राथाली प्रकाशनाने पोहचविले आहे.त्या बद्दल प्रकाशकांचे आणि महाराष्ट्र शासनाचे मी मनःपूर्वक आभारी आहेकथा लेखनाच्या प्रवासाबद्दल काय सांगाल ?२०१३ ची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आमच्या तांड्यावर असताना अर्धा तांडा उस कापायला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूर भागात जात होते. आमचे भाऊ, बंद असल्याने मी त्यांना वाटी लावण्यासाठी ट्रकजवळ उभा होतो. लहानसा मुलगा ट्रक जवळ उभा राहून खूप रडत होता तर मी विचारणा केली असता कोणती दिड- दमडीची शाळा बुडते म्हणून पंधरा दिवसांपासून डोकं खातं आहे म्हणे. दोन झपके दिले तेव्हा सोबत यायला तयार झाला आहे मात्र आताही रडतचं आहे  या घटनेपासून कथा लििहणे सुरू केले.अस्वस्थ तांडा" या पुस्तकाबद्दल काय सांगाल ?या संग्रहातील सर्वंच कथा सत्य घटनेवर आधारित असून तांड्याच्या एकुणच अस्वस्थतेच्या वर्णन करणा-या आहेत.  "अस्वस्थ तांडा" या कथासंग्रहात तांड्याच्या समस्येबरोबर तांड्याच्या संस्कृती,प्रथा, परंपरेचे वर्णन आले आहेतांड्यात जगणा-या लोकांना तुम्ही तुमच्या साहित्यातून कोणता संदेश द्यालं? तांडा आजही प्रचंड दारिद्र्यात, अंधश्रद्धेत,अज्ञानात, व्येसनाधिनतेत जगत आहे.या सर्व समस्येवर मात करण्यासाठी माझ्या तांड्यातील तमाम बांधवांनी आपल्या लेकरांच्या शिक्षणावर भर द्यावा. त्यांना अंधश्रद्धेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करावं.  संत सेवालाल महाराजांनी, महानायक वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलेल्या विज्ञानवादाचा स्विकार करून जीवन जगावे. सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या लोकशाहीचा वापर करून शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही या तत्वांचा वापर करून जगावे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत