शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुरघास बनविण्याच्या यंत्र खरेदीसाठी एकही प्रस्ताव नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 14:05 IST

जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८ मध्ये राज्यात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संभाव्य चाराटंचाईची धग कमी करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान मिळणार होते. मात्र, यासाठी जिल्ह्यात एकही प्रस्ताव प्राप्त नसल्याने आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पात्र शेतकरी गटांना अर्ज करता येईल.सन २०१८ च्या खरिप हंगामात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १५१ तालुक्यात तसेच याव्यतिरिक्त २६८ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ तर ९३१ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने यापूर्वीच घोषित केलेली आहे. भविष्यात चारा टंचाई जाणवू नये याकरीता हिरव्या वैरणीचे मुल्यसंवर्धन करून पोषक ‘मुरघास’ तयार करण्याला प्राधान्य दिले जाते. नानाजी देशमुख कृषी संजिवणी प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत दुष्काळी भागातील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गटांना मुरघास बनविण्याच्या विविध क्षमतेच्या यंत्रांच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान  दिले जाते. मात्र, यासाठी जानेवारी त फेब्रुवारी अशा दोन महिन्यात एकही प्रस्ताव प्राप्त झाला नाही. आता लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणुक निकालानंतरच अर्थात आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर पात्र शेतकरी बचत गट व कंपन्यांना अर्ज करता येतील.

टॅग्स :washimवाशिम