शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशीही अंत्यसंस्कार नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:10 IST

कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देसुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले.त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड: जवान सुनील धोपे यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबर रोजीही अंत्यसंस्कार होऊ शकले नाही. त्यांचा मृत्यू घातपातानेच झाल्याचा आरोप पुन्हा करीत, धोपे कुटुंबियांनी कारवाईच्या मागणीवर ठाम राहत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन देऊनही धोपे कुटुंब पार्थिव ताब्यात घेण्यास तयार झाले नाही. सीमा सुरक्षा दलात मेघालयातील सिलाँग येथे कार्यरत असताना कारंजा येथील जवान सुनील ढोपे यांचा १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारंजा येथे दाखल झाले; परंतु सुनीलचा मृत्यू घातपाताने झाल्याचा आरोप करीत धोपे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री १० वाजता सुनील धोपे यांचे पार्थिव अमरावती येथील शवागारात पाठविण्यात आले. मंगळवार १८ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा पालिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी कारंजा धोपे कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी झीरो एफआयआर दाखल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले; परंतु धोपे कुटुबांने त्यांचा प्रस्ताव फेटाळला. प्रत्यक्षात धोपे यांचा मृत्यू १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झाला होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूला चार दिवस उलटले तरी, अंत्यसंस्कार पार पडू शकले नाहीत. दरम्यान, १८ सप्टेंबर रोजीही या प्रकरणी कारंजात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमुळे एस टी बससेवा तसेच खाजगी वाहतूक देखील प्रभावित झाली होती.  विधवा पत्नी व्यथीत जवान धोपे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या विधवा पत्नी सविता धोपे म्हणाल्या की, त्यांच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, नोकरी सोडण्याचा पळपुटेपणा आपण करणार नसल्याचे पतीने म्हटले होते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ते सहा महिन्यानंतरच एकदा रजेवर यायचे. मी सहा महिने त्यांची प्रतिक्षा करीत होती. आता कोणाची प्रतिक्षा करू, आमच्या मुला-बाळांचे कसे होईल, पतीला न्याय न मिळाल्यास आपण जिवाचे बरे वाईट करू, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा