शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाला ‘झाकण’ बसविण्यासाठी निधीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 14:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेच्या वाईगौळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या २८ गावे पाणी पुरवठा योजनेच्या वाईगौळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेतील कुत्रा आढळून आल्याच्या एका महिन्यानंतरही कारखेडा, धानोरा, यावळी यासह अन्य गावातील पाण्याच्या टाक्यांना ‘झाकण’ बसविण्यात आले नाहीत. निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.मानोरा तालुक्यातील २८ गावांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वाईगौळ येथील जलशुध्दीकरण केंद्र परिसरातील पाण्याच्या टाकीत २० जून रोजी मृतावस्थेत कुत्रा आढळून आला होता. जलकुंभात मृतावस्थेतील कुत्रा आढळून येणे ही बाब म्हणजे नागरिकांशी जीवाशी खेळण्याचाच प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया २८ गावातील नागरिकांमधून उमटल्या होत्या. या घटनेपासून बोध घेऊन या २८ गावातील पाण्याच्या टाक्या सुरक्षीत ठेवणे आवश्यक होते. परंतू, अद्याप अनेक गावातील पाण्याच्या टाक्यांना सुरक्षिततेचा उपाय म्हणून झाकण किंवा आवरण नाही. त्यामुळे एखाद्या जलकुंभात पुन्हा एकदा अन्य वन्यप्राणी किंवा कुणीतरी पडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारखेडा, धानोरा, सावळी यासह अन्य तीन ते चार गावातील जलकुंभ वाºयावर असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एका महिन्याच्या कालावधीतही सुरक्षित उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने प्रशासकीय दिरंगाई चव्हाट्यावर आली आहे. २८ गावे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या जलकुंभाला झाकण बसविण्यासाठी निधी मिळावा याकरीता वरिष्ठांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याने तुर्तास हा प्रश्न प्रलंबित आहे.

२८ गावे पाणी पुरवठा योजने अंर्तगत सर्व जलकुंभाला ‘झाकण’ बसवण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच झाकण बसवण्यात येतील.- गजानन खराटे, शाखा अभियंतामहाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा