शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
3
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
4
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
5
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
6
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
7
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
8
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
9
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
11
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
12
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
13
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
14
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
15
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
16
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
17
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
18
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
19
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
20
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."

कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे ‘फायर ऑडिट’च नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 11:28 IST

Karanja sub-district hospital उपजिल्हा रुग्णालयाचे स्थापनेपासून (सन २०१७) फायर ऑडिटच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली. 

ठळक मुद्दे१०० खाटांचे असलेले कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे  २०१८ मध्ये कार्यान्वित झाले.फायर ऑडिटसंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भंडारा येथील भयंकर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांच्या ‘फायर ऑडिट’चा प्रश्न ऐरणीवर आला असून, शनिवारी ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेक केले असता कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे स्थापनेपासून (सन २०१७) फायर ऑडिटच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली. भंडारा येथील सामान्य रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या आगीच्या घटनेत १० बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील फायर ऑडिट व अग्निरोधक सिलिंडरची परिस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भात ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले असता  काही गंभीर बाबी समोर आल्या. १०० खाटांचे असलेले कारंजा उपजिल्हा रुग्णालय हे  २०१८ मध्ये कार्यान्वित झाले असून, आवश्यक  भौतिक सुविधा उपलब्ध न करताच या इमारतीचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण केल्याचे सांगण्यात येते. रॅम्पचे बांधकाम, महाराष्ट्र फायर सेफ्टी अ‍ॅक्ट २००२ च्या मानकानुसार अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग तसेच विद्युत पुरवठा व रोहित्र बसविणे याशिवाय इतर महत्वाच्या बाबींची पुर्तता झाली नाही. यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भाऊसाहेब लहाने यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कारंजाच्या सहायक अभियंत्यांशी पत्रव्यवहारही केला. परंतू, अद्याप हा प्रश्न निकाली निघू शकला नसल्याचे डॉ.लहाने यांनी सांगितले. त्यामुळे एखाद्यावेळी आग लागल्यास नियंत्रण मिळवावे कसे, हा प्रश्न निर्माण होऊ शकतो.दरम्यान, वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे गतवर्षी फायर ऑडिट झाले होते. ११ महिन्यानंतर फायर ऑडिट करणे आवश्यक असून,  लवकरच फायर ऑडिटसंदर्भात संबंधितांशी पत्रव्यवहार केला जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

अग्निरोधक सिलिंडरची पाच वर्षाची मुदत जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागात खबरदारीचा उपाय म्हणून अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात २०१८ मध्ये तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २०१८ मध्ये अग्निरोधक सिलिंडर बसविण्यात आले आहेत. या सिलिंडरची मुदत पाच वर्षे असून, वर्षातून एकदा संबंधित कंपनीकडून पाहणी होणे गरजेचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडरची पाहणी २०१९ मध्ये केली होती. तर कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील पाहणी अनियमित असल्याची माहिती आहे. 

अग्निशमन यंत्रणेची शनिवारी तपासणीजिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले असून, अग्निरोधक सिलिंडरही अद्ययावत आहेत. आगीच्या घटना घडू नये तसेच आगीच्या घटनेवर वेळीच नियंत्रण मिळावे म्हणून शनिवारी पुन्हा अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यात आली. यापुढेही अधिक दक्षता घेण्यात येईल.- डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक

कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा, संकटकाळी सुटकेचा मार्ग यासह अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात बांधकाम विभागाशी पाठपुरावा केलेला आहे. अद्याप सुविधा उपलब्ध करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.- डॉ. भाऊसाहेब लहाने वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कारंजा

  फायर ऑडिट म्हणजे काय?

  •   फायर ऑडीट हे संबंधित इमारत बांधल्यानंतर एकदाच हाेते. त्यानंतर तेथील उपकरणे सुरळीत आहेत किंवा नाही याची दर ११ महिन्यांनी तपासणी करून तसे प्रमाणपत्र अग्निशामक दलाकडून घ्यावे लागते. 
  •   पालिकेचा अग्निशामक विभाग हे ऑडीट करत असतो. पालिकेचा एक अधिकारी व सहाय्यक अग्नीशमन अधिकाऱ्यांचा यात समावेश असतो.
  •  संबंधित इमारतीची उंची व खोल्यांची संख्या विचारात घेवून त्यानुसार फी आकारल्या जाते.
  •   एका दिवसात पाहणी पुर्ण होते. यात तेथील पाईप योग्य आहे का? स्प्रींकलर कार्यरत आहेत का?, पाण्याची टाकी सुस्थितीत आहे का? याची पाहणी केली जाते.
  •   पाहणीनंतर तसे प्रमाणपत्र संबंधित कार्यालयाला किंवा विभागाला दिले जाते.
  •   पालिकेच्या हद्दीत अशा ऑडीटसाठी कमी फी आकारल्या जाते. हद्दीबाहेर वाढीव फी आकारल्या जाते.
  •   पाहणीमध्ये अग्निशामक यंत्राचे प्रेशर योग्य आहे का? रिफिलिंग करण्याची गरज आहे का? यंत्राला नोझल योग्य पद्धतीने बसवलेले आहेत का? याचीही तपासणी होते.
टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाhospitalहॉस्पिटल