लोकमत न्यूज नेटवर्ककिन्हीराजा (वाशिम) : दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत तिजोरीत ठेवून असलेली १४ लाख ८९ हजार २१४ रुपयांची रक्कम चोरट्यांनी तिजोरीसह लंपास केली. ३ मेच्या रात्री घडलेल्या या घटनेने चोरट्यांचे मनोबल वाढल्याचे सिद्ध होत असून पोलिसांच्या कार्यकर्तुत्वावर मात्र मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या किन्हीराजा येथील शाखेच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. शाखा कार्यालयात ठेवून असलेली तिजोरी न फोडता ती घेवून चोरट्यांनी पोबारा केला. याप्रकरणी शाखाअधिकारी बबन श्यामराव जाधव यांनी जऊळका पोलिस स्टेशनमध्ये ४ मे रोजी सकाळी फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी ठाणेदार बाळू जाधवर यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक चव्हाण, पोलिस उपअधीक्षक बनसोड यांनीही घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान श्वानपथक, फिंगर प्रिंट एक्सपर्टकडूनही तपास करण्यात आला. मात्र, वृत्त लिहिस्तोवर चोरट्यांचा कुठलाही सुगावा लागलेला नव्हता.
किन्हीराजात जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा; तिजोरीसह १४ लाखांची रक्कम लंपास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:50 IST
किन्हीराजा (वाशिम) : दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत तिजोरीत ठेवून असलेली १४ लाख ८९ हजार २१४ रुपयांची रक्कम चोरट्यांनी तिजोरीसह लंपास केली.
किन्हीराजात जिल्हा मध्यवर्ती बँकेत दरोडा; तिजोरीसह १४ लाखांची रक्कम लंपास!
ठळक मुद्देचॅनल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.तिजोरी न फोडता ती घेवून चोरट्यांनी पोबारा केला.श्वानपथक, फिंगर प्रिंट एक्सपर्टकडूनही तपास करण्यात आला.