शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

नववर्षात पालिकेचे नाट्यगृह जनसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 14:32 IST

थांबलेले सांस्कृतीक उपक्रम सुरु होत असल्याने नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

- नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगरपालिकेच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्याने अनेक वर्षापासून रखडलेले वाशिम शहरातील नाट्यगृह नव्या वर्षात जनसेवेत येणार आहे. याकरिता वाशिम नगरपरिषदेचे अध्यक्ष अशोक हेडा यांचे महत्प्रयास कामी आले. ८३५ आसन क्षमतेचे हे प्रस्तावित नाट्यगृह पूर्णत्वास आले असून शहरातील सांस्कृतिक उपक्रमांची अडचण यामुळे दूर होणार आहे. सध्या थांबलेले सांस्कृतीक उपक्रम सुरु होत असल्याने नाटयप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.नगरपालिकेने टेंम्पल गार्डननजिकच्या जागेत ८३५ आसन क्षमतेचे सर्व सुविधायुक्त नाट्यगृह प्रस्तावित केले आहे. अनेक वर्षापासून या नाटयगृहाचे काम सुरु आहे. परंतु नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्याबरोबर याला प्राधान्य देत काम पूर्णत्वाकडे नेले आहे. लवकरच याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे सांगून नाटयगृह जनसेवेत येणार असल्याचे हेडा यांनी सांगितले.नाट्यगृह उभारणीसाठी लाखो रुपयांचे अनुदान मंजूर असून या नाट्यगृहाच्या आसन व्यवस्थेसाठी स्लोपिंग स्लॅब टाकला गेला असून उदघाटनाचा मुहूर्त पाहून लवकरच हे नाटयगृह जनसेवेत रुजू होणार आहे. या नाटयगृहामुळे संगीत मैफल, नाटक, भाव-भक्तीगीते मैफल व अन्य कार्यक्रम सुरू होऊन शहराला लाभलेला साहित्य, सांस्कृतीक कार्यक्रमाचा वसा कायम राहण्यास मदत होईल . विदर्भामध्ये सर्व सोयीयुक्त नाटयगृह वाशिमसारखे दुसरे नसणार असल्याचे हेडा यांनी सांगितले. याकरिता तज्ञांच्यावतिने मार्गदर्शन घेऊन हे नाटयगृह उभारण्यात येत आहे. तसेच तारांगणही लवकरच जनसेवेत रुजू होणार आहे.नविन वर्षात शहरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा शहरात सुरु असलेल्या ६ पुलांच्या कामापेैकी ३ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शिवाजी चौक, काळे फैल व जिल्हा सामान्य रुग्णालयसमोरील पुलाचा समावेश आहे. टिळक गार्डन , गोपाल टॉकीज व स्मशानभूमीसमोरील पुलाचे काम नविन वर्षात पूर्ण करण्याचा मानस. रस्ता झाडण्यासाठी नगरपालिकेच्यावतिने नव्याने रस्ता झाडण्याची (रोड स्विपिंग) मशिन आणण्यात आली असून नविन वर्षापासून या मशिनव्दारे रस्ते झाडण्यात येणार आहे. जेटींग -सक्शन मशिन उपलब्ध - या मशिनव्दारे भूमिगत गटार योजनेचे चेंबर स्वच्छ करण्याचे काम नविन वर्षापासून करण्यात येणार आहे. सिग्नल व सिसीटीव्ही कॅमेरे लागणार - वाशिम शहरातील अकोला नाका, पोलीस स्टेशन चौक, आंबेडकर चौक, पाटणी चौक व पुसद नाका येथे सुविधा नविन वर्षात राबविण्यात येणाार तसेच १० ठिकाणी ब्लिकर्स लाईटची व्यवस्था ४नगरपरिषदेच्यावतिने नवीन वर्षापासून शववाहिनी उपलब्ध करुन देणार आहे. नारायण बाबा तलावाचे सौदर्यीकरण करण्यात येणार आहे. तलाव संवर्धन व पर्यावरण योजनेंतर्गंत करण्यात येणार आहे. याकरिता साडेतीन करोड रुपये उपलब्ध झाले असून पैसाही नगरपालिकेकडे आला आहे. कचºयापासून खत निर्मिती प्रकल्प डम्पींग ग्राऊंडवर सुरु होणारवाशिम शहरातील विकास झपाटयाने होत आहे. याकरिता जिल्हयातील नेत्यांचा, लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, नगरसेवकांसह नागरिकांचे मार्गदर्शन लाभत आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण कटीबध्द असून शहराला सिसीटीव्ही कॅमेरे व चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा लवकरच जोडल्या जाणार आहे.-अशोक हेडानगराध्यक्ष, नगरपरिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिम