शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

रिपोर्ट द्यायला सोबत गेला म्हणून माजी उपसरपंचांचा खूनच केला!

By नंदकिशोर नारे | Updated: November 30, 2023 16:38 IST

देपूळ येथील घटना, आरोपीवर गुन्हा दाखल

वाशिम : पोलिसांत रिपोर्ट द्यायला सोबत का गेला म्हणून आरोपीने देपुळ येथील माजी उपसरपंचांचा डोक्यात विटीने घाव घालून खून केला. ही थरारक घटना २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता वाशिम तालुक्यातील देपूळ येथे घडली. संजय दूर्योधन गंगावणे (वय ५५ वर्षे), असे मृतक माजी उपसरपंचाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाचा मुलगा आतिश गंगावणेच्या फिर्यादीवरून आसेगाव पोलिसांनी आरोपी रामदास भाऊराव गंगावणे रा. देपूळ, ता. वाशिम याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली.मृतक संजय गंगावणे यांचा मुलगा आतिश गंगावणे (वय ३३ वर्षे) रा. देपूळ, ता. वाशिम याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीचा आशय असा की, १९ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपी रामदास गंगावणेने त्याचा ओटा फिर्यादीच्या काकाच्या ट्रॅक्टरने खचल्याचा खोटा रिपोर्ट दिला होता. त्यानंतर फिर्यादीचे चुलत काका महादेव लक्ष्मन गंगावणे यांनीही रामदास गंगावणेच्या विरोधात पोलिसांत रिपोर्ट दिला होता. तेव्हा त्यांच्यासोबत फिर्यादीचे वडील संजय गंगावणे गेले होते. त्यावरून रामदास गंगावणे याने रिपोर्ट देण्याकरीता सोबत का गेला म्हणून फिर्यादीचे वडील संजय गंगावणे यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. ही बाब त्यांनी फिर्यादीला सांगितली होती.

अशातच २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी घरी असताना त्याचे वडील संजय गंगावणे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास फिर्यादी गावातील बसथांब्याजवळ मोबाईल पाहत असताना त्याला जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने फिर्यादी गेला असता आरोपी रामदास गंगावणे हा फिर्यादीच्या वडिलांना डोक्यात विटीने मारत असल्याचे दिसले. त्यावेळी आरोपी रामदास गंगावणेचा पिता भाऊराव गंगावणेसुद्धा तेथे होता. फिर्यादीला पाहताच आरोपी रामदास गंगावणे तेथून निघून गेला, तर फिर्यादी पोहोचल्यानंतर भाऊराव गंगावणेही तेथून निघून गेला.

संजय गंगावणे गंभीर जखमी झाल्याने फिर्यादीने गावातील अरूण गंगावणे यांच्या वाहनाने त्यांना वाशिम येथील रुग्णालयात आणले. तेथून त्यांना अकोला येथे रुग्णवाहिकेने नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती फिर्यादीच्या भावाने दिली. त्यामुळे आरोपी रामदास गंगावणे यानेच जुन्या कारणावरून वडिलांचा खून केल्याचे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले. यावरून पोलिसांनी आरोपी रामदास गंगावणेविरोधात कलम ३०२ व ५०६ नुसार दाखल करून त्यास अटक केली; परंतु वृत्तलिहिस्तोवर आरोपीच्या पित्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी