शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाच मुलींनी दिला पित्याच्या पार्थिवास साश्रृनयनांनी खांदा व भडाग्नी

By नंदकिशोर नारे | Updated: September 21, 2023 14:32 IST

वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले.

वाशिम : आई वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा नसेल तर रूढी परंपरेने मुलींना तो अधिकार दिलेला नाही. मात्र, हिंमतीने रूढींचे जू दूर करीत तो अधिकार मिळवता येत असल्याचे  एक उदाहरण वाशिम येथील भगिनींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा व अग्नी देऊन दाखवून दिले आहे. वाशिम येथील अकोला रस्त्यावर असलेल्या दत्त नगरमधील रहिवासी तथा सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी जिजेबा किसन पट्टेबहादूर (७१) यांचे २० सप्टेंबर राेजी रात्री उशिरा निधन झाले. त्यांना मुलगा नसून पाचही मुलीच आहेत.  

मुलगा नसल्याने मृत्यूनंतर  मुलींनी २१ सप्टेंबर रोजी साश्रृनयंनांनी वडिलास खांदा देऊन त्यांच्या पार्थिवाला अग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला . त्यांच्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक होत असतानाच अकाली गेलेल्या वडिलांच्या सेवेतील मुलींना बघून हळहळही व्यक्त केली जात होती. यावेळी जिजेबा यांच्या मुली उज्वला, रुपाली, पूजा, दिपाली, खुशी यांनी एकच आक्रोश केलेला दिसून आला. जिजेबा यांच्या मुली खासगी नोकरी तर काही जण शिक्षण घेत आहेत. 

दत्तनगर परिसरातील पट्टेबहादूर हे ए नामांकित व मनमिळावू कुटुंब आहे. मृत्यूनंतर होणारे सोपस्कार हा मुलगाच करु शकतो. ही खंत मनात न ठेवता पाचही मुलींनी जिजेबा यांना खांदा दिला व स्मशानभूमित रितीरिवाजानुसार सोपस्कार पूर्ण करीत पित्याला भडाग्नी देऊन मुलाची कमतरता या मुलींनी शेवटच्या क्षणालाही भासू दिली नाही. स्मशानभूमित शेकडो नातेवाईकांनी हा प्रसंग आपल्या डोळ्यांनी बघितला. जिजेबा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांबाबत अनेकांमध्ये हळहळ व्यक्त केली .

अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या जावयासह एकावर घालाआपल्या सासरेबुवांचे निधन झाल्याची वार्ता कळताच  अंत्यसंस्कारासाठी रात्री उशिरा मोटारसायकलने पुणे येथून निघालेल्या जावयाचा व त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचे जावई यांचा मृत्यू अपघातात झाल्याची घटना संभाजीनगर नजिक २१ सप्टेंबर रोजी घडली. जिजेबा पट्टेबहादूर यांची दिपाली नामक मुलगी पुणे येथे वास्तव्यास आहे. मुलगी आाधीच वाशिम येथे आलेली होती. सासरेबुवा यांचे निधन झाल्याचे जावई विजय उत्तम इंगोले यांना कळाल्यावर ते व सोबत त्यांचे जावई सतिष रसाळ मोटारसायकलने वाशिम करता निघाले. रस्त्यात संभाजीनगरजवळ त्यांचा अपघात होऊन यात दोघांचा मृत्यू झाला. याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :washimवाशिम