शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘इडी’ सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करणे बंद करावे- नाना पटोले

By सुनील काकडे | Updated: September 24, 2022 17:34 IST

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे.

वाशिम

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीची मजाक करणे सुरू आहे. विद्यमान ‘इडी’ सरकार राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्लीच्या वाऱ्या करण्यात धन्यता मानत आहे. या सरकारने दिल्लीची हुजरेबाजी करून एकप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान करणे सुरू केले, अशी घणाघाती टिका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज, २४ सप्टेंबर रोजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

काॅंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेली भारत जोडा पदयात्रा वाशिम जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. यानिमित्त प्रवासमार्गाची पाहणी करण्यासाठी नाना पटोले आले असता, त्यांनी वाशिमच्या विश्रामगृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, विविध स्वरूपातील अडचणी आणि समस्यांना वाचा फोडून देश वाचविण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वधर्मीयांना सोबत घेऊन भारत जोडा पदयात्रा आरंभीली आहे. या यात्रेत पंजा नव्हे; तर तिरंगा खांद्यावर घेण्यात आला आहे. त्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

काॅंग्रेसने जनतेचा विश्वास सार्थ ठरविल्यानेच अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात याच पक्षाची सत्ता होती. त्या काळात पक्षाने कधीही व्देषाचे राजकारण केले नाही. कुणाच्याही मागे इडी लावली नाही. बेरोजगारी कमी करणे, महागाई नियंत्रणात ठेवणे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करणे यासह देशहिताचे निर्णय पक्षाने सातत्याने घेतले. सत्तेत नसताना महागाईविरोधात सर्वाधिक मोर्चे काॅंग्रेसनेच काढले. भर पावसात पक्षाने ७५ किलोमिटर तिरंगा यात्रा काढली, असे पटोले म्हणाले.पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी गुलदस्त्यातमहाराष्ट्रात जेव्हापासून ‘इडी’चे सरकार आले, तेव्हापासून सर्वकाही आलबेल सुरू असल्याचे सांगून २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याची सीबीआय चाैकशी अद्याप गुलदस्त्यात असल्याचे पटोले म्हणाले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासाठी महाराष्ट्रातील नागपूरवरून बारूद गेल्याची शंका उपस्थित झाली होती, त्याची सीबीआय चाैकशी करण्याची ग्वाही सरकारने दिली होती; मात्र त्याचे नेमके काय झाले, असा सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केला.सरकार आंधळे, बहिरे आहे का?सध्या महागाई नियंत्रणाबाहेर आहे. बेरोजगारीचा आलेख उंचावत आहे. अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. बुरशीजन्य रोगाने सोयाबीनची अतोनात हानी झाली. असे असताना विद्यमान सरकार आंधळे, बहिऱ्याची भूमिका घेत आहे. वाशिम जिल्ह्यात येऊन गेलेले कृषिमंत्री झाडाला लागलेल्या १५० शेंगा दाखवत आहेत. ही जनतेची एकप्रकारे थट्टा असल्याची टिका पटोले यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले