शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Washim: रिव्हर्सची कटकट मिटणार; वळण रस्ता बायपासशी जोडणार

By दिनेश पठाडे | Updated: March 23, 2024 18:59 IST

Washim News: अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड हा राष्ट्रीय चारपदरी रस्ता तयार करण्यात आला असून महामार्ग चकाचक झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, हिंगोलीहून वाशिम शहरात येण्यासाठी बायपासजवळील  वळण रस्त्यावर अवजड वाहनचालकांना तीन-चारदा रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ येत होती.

- दिनेश पठाडेवाशिम - अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड हा राष्ट्रीय चारपदरी रस्ता तयार करण्यात आला असून महामार्ग चकाचक झाला आहे. त्यामुळे वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, हिंगोलीहून वाशिम शहरात येण्यासाठी बायपासजवळील  वळण रस्त्यावर अवजड वाहनचालकांना तीन-चारदा रिव्हर्स गिअर टाकण्याची वेळ येत होती. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून समस्या उजागर केली. त्याची दखल घेत काम सुरू करण्यात आले असून बायपास रस्ता वाशिम रस्त्याला जोडला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग चारपदरी सिमेंट काँक्रिटीकरणाचा तयार करण्यात आला आहे. वाशिम शहरातील वाहतूककोंडीची समस्या निकाली निघावी यासाठी वाशिम शहरानजीक बायपास निर्माण केला.  मात्र, हिंगोलीवरून वाशिम शहरात येणाऱ्या वाहनचालकांना उड्डाणपुलाखालून वळण घेऊन पुन्हा डांबरीकरण रस्त्यावर यावे लागते. डांबरीकरण रस्त्यावर वळण घेताना विशेषत: अवजड वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती असून तीन ते चार वेळा वाहन रिव्हर्स घेण्याची वेळ येते.

त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात होता, शिवाय अपघाताची भीती होती. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना बायपासजवळील जमीन उपलब्ध झाली नव्हती. त्यामुळे त्यावेळेस हे काम करणे शक्य झाले नाही. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली. आता नवीन कंत्राटदारामार्फत बायपास जवळ रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालून थेट वाशिममार्गाशी रस्ता जोडला जाणार असून रिव्हर्सची कटकट मिटणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकwashimवाशिम