शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये थॅलेसिमीया आजाराची रॅलीव्दारे जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 17:38 IST

वाशिम : ‘थॅलेसीमिया’ आजाराबाबत नागरिकांना माहिती व्हावी व योग्य उपाययोजनेतून हा आजार नष्ट व्हावा, या उद्देशाने जागतीक थॅलेसीमिया दिनाचे औचित्य साधून वाशिममध्ये बुधवार, ८ मे रोजी मुख्य मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘थॅलेसीमिया’ आजाराबाबत नागरिकांना माहिती व्हावी व योग्य उपाययोजनेतून हा आजार नष्ट व्हावा, या उद्देशाने जागतीक थॅलेसीमिया दिनाचे औचित्य साधून वाशिममध्ये बुधवार, ८ मे रोजी मुख्य मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, ठाणेदार आधारसिंग सोनोने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बालाजी हरण, डॉ. किशोर लोणकर आदी मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका यामार्गे काढण्यात आलेल्या या रॅलीचा जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात समारोप झाला. रुग्णालयातील स्कील लॅब हॉलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले, की थॅलेसीमिया हा लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबीन या घटकांशी संबंधित आजार असून तो जगभरात आढळून येतो. वाशिम जिल्ह्यातही या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आजारामध्ये लाल पेशीचे जीवनमान कमी होते. त्यामुळे रुग्णांना दर तीन आठवड्याला रक्ताची गरज भासते. थॅलॅसीमिया या आजाराची लक्षणे वयाच्या तिसºया महिन्यापासून २ वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतात. यामध्ये बाळ सुस्त होणे, वारंवार आजारी पडणे, पाणथडीच्या वाढीमुळे पोट फुगणे, रक्त न दिल्यास चेहºयाचा आकार बदलणे, वाढ खुंटणे, अशी लक्षणे दिसून येतात. थॅलॅसिमियाग्रस्त रुग्णांना वेळेत रक्तदाते उपलब्ध व्हावेत व या आजाराविषयी जनजागृती होवून त्यावरील उपाययोजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. कावरखे यांनी यावेळी केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी उत्कर्ष ब्लड ग्रुपचे पंकज गावंडे, रक्तदान ग्रुपचे पंकज गाडेकर, रमेश चांदवाणी, राजू कोंघे, मोरया ब्लड ग्रुपचे महेश धोंगडे, जीवन अमृत रक्तपेढीचे सचिन दंडे यांच्यासह थॅलेसीमिया जनजागृती समितीने पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य