वाशिम : ठाकरे विरूद्ध ठाकरे या वादाने अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघत असतानाच आज जिल्हा परिषेदतील सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्यांनाही हा वाद नव्याने अनुभवला. फक्त वाद करणार्यामध्ये होते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व कृषी सभापती हेमेंद्र ठाकरे. पदाधिकार्यांच्या निवासस्थानावर झालेल्या खर्चाला मंजुरात देण्यावरून हा वाद उद्भवला होता. दिवंगत वसंतराव नाईक सभागृहात स्थानिक जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज पार पडली. अध्यक्षा सोनाली जोगदंड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती चक्रधार गोटे, हेमेंद्र ठाकरे, पानुबाई जाधव मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती. गत डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेचा कारभार नव्या धुरकर्यांनी हातात घेतला. त्यानंतर नव्या पदाधिकार्यांसाठी निवासस्थानांची दुरूस्ती करण्यात आली होती. सदर दुरूस्ती करताना पदाधिकारी अथवा सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नाही असा आरोप आज कृषी सभापती हेमेंद्र ठाकरे यांनी या सर्वसाधारण सभेत केला. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी निवासस्थानावरील खर्चाला सभागृहाने मान्यता द्यावी असा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. यावर हेमेंद्र ठाकरे यांनी या कामासाठी कुणालाच विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे सभागृहाने या प्रस्तावाला मंजुरात कशी द्यावी असा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. नेमकी येथेच ी चंद्रकांत ठाकरे यांच्यासोबत त्यांचे खटके उडाले. दोन्ही ठाकरेंमध्ये रंगलेली ही जुगलबंदी तब्बल तासभर सभागृहाने अनुभवली. या वादामुळे आजच्या महत्वपूर्ण सभेत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकली नाही.
ठाकरे विरूद्ध ठाकरे वादाने गाजली सर्वसाधारण सभा
By admin | Updated: May 20, 2014 22:43 IST