शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

शासकीय कापूस खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: January 6, 2017 19:24 IST

शासनाच्या हमीभावानुसार कापसाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राला दोन महिन्यांत कापसाचे बोंडही खरेदी करता आले नाही.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 6 - शासनाच्या हमीभावानुसार कापसाची खरेदी करण्यासाठी सुरू केलेल्या शासकीय खरेदी केंद्राला दोन महिन्यांत कापसाचे बोंडही खरेदी करता आले नाही. शासनाकडून जाहीर मीभावापेक्षा जवळपास दीडपट भाव खासगी बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय केंद्राकडे पाठ केली आहे. आता यंदा मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस पडला असला तरी कपाशीचे क्षेत्र मात्र मोठ्या प्रमाणात घटले आहे.  कपाशीसाठी मोठे परीश्रम घेऊनही या पिकाला अपेक्षीत भाव मिळत नसल्याने शेतकºयांनी या पिकाकडे पाठ केली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ३० हजार ८५७ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती; परंतु यंदा केवळ १८ हजार ६३० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. मागील वर्षाप्रमाणच ९० टक्के क्षेत्र हे कारंजा आणि मानोºयातच आहे. यंदा १८ हजार ६३० हेक्टरमधील ११ हजार १०० हेक्टरवर क्षेत्र कारंजात, तर ६ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर मोनोऱ्यात कपाशीचा पेरा झाला. त्यावरून इतर तालुक्यात कपाशीची पेरणी नावापुरतीच झाल्याचे स्पष्ट होते. उत्पादन कमी असल्यामुळे मागणी अधिक आहे; परंतु शासनाने जाहीर केलेले  ४ हजार १६० रुपये क्विंटलचे तोकडे दर कापूस उत्पादक शेतकºयांच्या मुळावर घाव करणारे ठरले. शासनाच्या हमीभावापेक्षा जेमतेम ८०० रुपये अधिक भाव देऊ व्यापाºयांनी कपाशीची खरेदी सुरू केली. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर येथे १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सीसीआयमार्फत कापसाच्या शासकीय खरेदीची सुरुवात करण्यात आली तरी, ६ जानेवारी २०१७ पर्यंत  या ठिकाणी कपाशीच्या बोंडाचीही खरेदी होऊ शकली नाही. तोकडे हमीभाव जाहीर केल्यानंतर केवळ नावापुरते शासकीय कापूस खरेदी केंंद्र सुरू करून शासनाने जणू शेतकºयांची थट्टाच चालविली आहे, असे मत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे. दरम्यान, हंगाम संपत आला असताना आता कपाशीला व्यापाºयांकडून जवळपास सहा हजार रुपये प्रति क्विंटलचे भाव मिळत आहेत.