शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

'चित्रकले'च्या वाढीव गुणांना दहावीचे विद्यार्थी मुकणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:08 IST

Washim News विहित मुदतीत प्रस्ताव सादर करू न शकणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांना मुकावे लागणार आहे.

- संतोष वानखडेवाशिम : चित्रकला विषयातील एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा प्राविण्य क्षेणीत उत्तीर्ण करणाºया विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालात सवलतीचे वाढीव गुण मिळतात. २०२० मध्ये कोरोनामुळे इंटरमिजिएट परीक्षा झाली नसल्याने आणि २०१९ मधील ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र बहुतांश शाळांपर्यंत पोहचले नसल्याने १५ जानेवारीपर्यंत विभागीय मंडळांकडे प्रस्ताव सादर कसे करावे? असा पेच विद्यार्थ्यांसह कला शिक्षकांना पडला आहे.२०२० मध्ये मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. इयत्ता नववी ते बारावीचा अपवाद वगळता उर्वरीत शाळेतील शिक्षण अद्याप सुरू झाले नाही. कोरोनामुळे २०२० या वर्षात चित्रकला विषयातील इंटरमिजिएट परीक्षादेखील घेण्यात आली नाही. सातवी ते दहावीचे विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेसाठी पात्र असून, या परीक्षेतील प्राविण्य श्रेणीनुसार दहावीच्या निकालात सवलतीचे वाढीव गुण समाविष्ठ केले जातात. सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत राज्यातील परीक्षा मंडळांनी १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. या वाढीव गुणांसाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कोरोनामुळे सन २०२० मध्ये इंटरमिजिएट परीक्षा झाली नाही. तसेच सन २०१९ मधील ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र वाशिमसह राज्यातील अनेक शाळेत पोहचले नसल्याने विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावे कसे? असा पेच विद्यार्थ्यांसह कला शिक्षकांना पडला आहे. विहित मुदतीत प्रस्ताव सादर करू न शकणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांना मुकावे लागणार आहे.

 महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचा पाठपुरावासवलतीच्या वाढीव गुणांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, सन २०१८ व २०१९ मधील ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र सर्व शाळांपर्यंत पोहचविण्यात यावे, इंटरमिजिएट परीक्षा तातडीने घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाकडे केली आहे.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणexamपरीक्षा