वाशिम : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वाशिम बसस्थानकातील चौकशी कक्षातील कर्मचार्यांना दूरध्वनीची अँलर्जी झाल्याचे दिसून येते. दूरध्वनीच उचलत नसल्यामुळे प्रवाश्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. १७ रोजी पुन्हा या बाबीची प्रचिती आली. चौकशी कक्षातील दूरध्वनी किमान १५ ते २0 वेळा खणखणला; परंतु कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. कदाचित तांत्रिक कारणामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते.
चौकशी कक्षाला दूरध्वनीची ‘अँलर्जी’
By admin | Updated: October 29, 2014 01:28 IST