शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तहसिलदारांचे काम बंद; महसूल यंत्रणा प्रभावित

By संतोष वानखडे | Updated: April 3, 2023 12:58 IST

यामध्ये जिल्ह्यातील १० तहसिलदार, २५ नायब तहसिलदार सहभागी झाल्याने महसूल यंत्रणा प्रभावित झाल्याचे पाहावयास मिळाले.

वाशिम: नायब तहसिलदार, तहसिलदार पदाला वर्ग दोनचा दर्जा असतानाही वेतनश्रेणी वर्ग तिनची लागू असल्याने, हा अन्याय दूर करण्यासाठी ३ एप्रिलपासून नायब तहसिलदार, तहसिलदार संघटनेने राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामध्ये जिल्ह्यातील १० तहसिलदार, २५ नायब तहसिलदार सहभागी झाल्याने महसूल यंत्रणा प्रभावित झाल्याचे पाहावयास मिळाले.नायब तहसिलदार, तहसिलदार पदाचा दर्जा वर्ग दोनचा करण्यात आला. मात्र, वेतनश्रेणी वर्ग तीनच्या पदाची देण्यात येते.

वेतनश्रेणीत सुधारणा करून नायब तहसिलदारांना राजपत्रित वर्ग -२ चे ४,८०० रुपयांचे ग्रेड पे लागू करावे, या मागणीसाठी नायब तहसिलदार, तहसिलदार संघटनेने सन १९९८ पासून लढा उभारला आहे. मात्र, मागणीची दखल शासनाने घेतली नसल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत ३ एप्रिलपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. याला वाशिम जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून, पहिल्या दिवशी सोमवारी (दि.३) वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पेंडाॅल टाकून आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिम