शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पानगव्हाण येथे आरोग्य विभागाचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 16:52 IST

पथकाने या गावात दाखल होत घरोघरी भेटी दिल्या, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली.

लोकमत न्युज नेटवर्ककाजळेश्वर (वाशिम): कारंजा तालुक्यातील पानगव्हाण येथे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव वाढला होता. यात काहींना अतिसाराची लागण झाली होती. त्यात दोन बालकांना डेंग्युसदृश आजाराची लागण झाली होती. या संदर्भात लोकमतने ५ फेब्रुवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाºयांसह आरोग्य विभागाच्या पथकाने या गावात दाखल होत घरोघरी भेटी दिल्या, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली. यावेळी अतिसाराचा एक रूग्ण, तापाचे सात रुग्ण आढळून आले. कारंजा तालुक्यातील पानगव्हाण येथे विविध आजारांची साथ पसरली असताना आरोग्य विभाग याबाबत अनभिज्ञ होता, तसेच या गावातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महागाव येथील आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने पानगव्हाण येथील गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी कारंजा येथील खासगी दवाखान्यात मोठा खर्च करावा लागत होता. त्यातच गावातील अर्णव विनोद काळे (११) आणि वैदेही ज्ञानेश्वर ताठे (१०) या दोन बालकांना डेंग्युसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांच्यावर कारंजा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या पालकांकडून मिळाली होती. लोकमतने या संदर्भात ५ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. त्याची घेत तालुका आरोग्य अधिकाºयांनी त्यांच्या सहकाºयांसह पानगव्हाण येथे भेट दिली. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन रुग्णांची पाहणी, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली. त्यावेळी गावात तापाची लागण झालेले ७ रुग्ण, तर अतिसाराची लागण झालेला एक रुग्ण आढळला असून, त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू असल्याचे कळले. त्याची प्रकृती बरी असल्याचेही कळले. प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे, महागावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नागुलकर, सोनोने, खुळे, पद्लमवार आदिंचा पथकात समावेश होता. दरम्यान, आरोग्य विभागाच्यावतीने गावातच उपचार होण्याच्या दृष्टीने आरोग्य पथक कार्यान्वित करण्यात आले असून, रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनाही राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गावात कोणत्याही व्यक्तीला डेंग्युची लागण झाल्याचे निष्पन्न झाले नसल्याने गावकºयांनी घाबरू नये, असे आवाहन डॉ. शंकर नांदे यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिम