वाशिम: दिवाळीच्या धामधुमीत शहरात झालेला घाण कचरा साफ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने शहरात विविध ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छता अभियानाची घोषणा केल्यानंतर म.रा. शिक्षक परिषद जिल्हा शाखा वाशिमचे पदाधिकारी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून जनतेला स्वच्छतेचा संदेश देत आहेत. दिवाळीच्या सणात बाजारात मोठी घाण आणि कचरा जमा होतो. त्यामुळे शहराला अवकळा येते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाºयांनी हातात खराटा घेऊन आंबेडकर चौकात सकाळी ६ ते ९ या वेळेत स्वच्छता अभियान राबविले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचा बाहेरील परिसर तसेच दुगार्देवी मंदिर परिसरामध्ये पसरलेला केरकचरा जमा करुन जाळून टाकला व परिसर स्वच्छ केला. या चौकात आदल्या दिवशी दिवाळीचा बाजार भरत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पसरला होता. या स्वच्छता अभियानात म.रा. शिक्षक परिषदेचे अमरावती विभाग सहकार्यवाह राजकुमार बोनकिले, भाजपा शहराध्यक्ष धनंजय हेंद्रे, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल काटेकर, प्रा थ. जिल्हाध्यक्ष राजेश संगवई, पाचुसिंग साबळे, नरेंद्र कव्हर, मंगेश बोरा, विजय कोरान्ने, बालाजी पवार आदींचा सहभाग होता.
शिक्षकांनी वाशिम शहरात राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 16:06 IST
वाशिम: दिवाळीच्या धामधुमीत शहरात झालेला घाण कचरा साफ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा वाशिमच्यावतीने शहरात विविध ठिकाणी दरवर्षीप्रमाणे स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.
शिक्षकांनी वाशिम शहरात राबविले स्वच्छता अभियान
ठळक मुद्देआदर्श उपक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वाशिमचा पुढाकार