शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदली प्रक्रियेत अडचणी कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:57 IST

७ जून पर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जि. प . शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत अडचणी कायम आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाला बदली प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बदल्या करण्यास ७ जूनपर्यंत शासनाने २७ मे रोजी मुदतवाढ दिली होती ; पंरतु कोठे समुपदेशन केंद्राचा अभाव, तर कोठे मॅपिंग होऊनही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नसणे आदि कारणांमुळे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे चित्र पश्चित वºहाडात पाहायला मिळत आहे. या संदर्भात ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना बदली प्रक्रियेला वेग देण्याच्या सुचना ७ जूनच्या पत्राद्वारे केल्या आहेत.अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू झाली असून, जिल्ह्यातील ३४७१ पैकी २९१२ शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित ५०० शिक्षकांचे मॅपिंग तातडीने करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी, ७ जून पर्यंत जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. बुलडाणा जिल्ह्यात ६३५७ शिक्षकांचे मॅपिंग झाले असून, या ठिकाणी शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. त्याशिवाय वाशिम जिल्ह्यात ३१५७ शिक्षकांपैकी ३०५० शिक्षकांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, जिल्ह्यातील एकाही तालुक्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले नसून, व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षकांना समुपदेशन करण्यात येत आहे. यात कोणता शिक्षक बदलीसाठी पात्र आहे. अर्ज करण्याची पद्धती तसेच, इतर माहिती देण्यात येत आहे; परंतु या प्रकारामुळे शिक्षकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यात मुख्यकार्यकारी अधिकाºयांच्या लॉगिनमधील बदलीच्या अनुषंगाने संवर्ग १ ते संवर्ग ४ मधील सर्व शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत चुका होऊ नयेत म्हणून योग्यरित्या समुपदेशन करण्यात येत आहे. येत्या दोन चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.-अंबादास मानकरशिक्षणाधिकारी (प्राथमिक)जि.प. वाशिम 

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक