शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 11:49 IST

Teacher recruitment News : विविध कारणांनी रखडलेली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे़.

- संदीप वानखडे

 बुलडाणा : गत काही महिन्यांपासून विविध कारणांनी रखडलेली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे़. १४ मे राेजी पवित्र पाेर्टलवर मुलाखतीशिवाय रिक्त राहिलेल्या १९६ जागांसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे़. कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवारांमुळे या जागा रिक्त राहिल्या हाेत्या़.पारदर्शक शिक्षक भरती करण्यासाठी युती शासनाच्या काळात पवित्र पाेर्टल तयार करण्यात आले हाेते़ .या पाेर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला हाेता़ ७ फेब्रुवारी २०२० राेजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली हाेती़ या यादीवर काही उमेदवारांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती़. या याचिकांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून १४ मे राेजी विशेष फेरी घेण्यात आली़.

पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी उमेदवारांची पात्रता पडताळणी करून पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. विहित मुदतीनंतर कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवार अशा एकूण १९६ रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमधील यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार संबंधित व्यवस्थापनाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी ही फेरी घेण्यात आली आहे़ १४ मे राेजी निवड यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना नियुक्ती मिळालेल्या संस्थेमध्ये रुजू व्हावे लागणार आहे़.

मुलाखतीसह पदभरती लवकरच

गेल्या वर्षभरापासून पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती रखडली हाेती़ मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी संस्था आणि जिल्हा परिषद, नगर पालिकांच्या शाळांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली हाेती़ मुलाखतीसह पदभरतीची उमेदवारांना प्रतीक्षा हाेती़ रिक्त जागासाठी निवड यादी जाहीर झाल्याने मुलाखतीसह पदभरती लवकरच हाेणार असल्याचे संकेत आहेत़ मुलाखतीसह पदभरतीबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.