शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विविध प्रलंबित प्रश्नांवरून शिक्षक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:31 IST

वाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न सुटणे अशक्य झाल्याने शिक्षक आक्रमक झाले असून येत्या ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी बैठक ठेवण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : विविध स्वरूपातील प्रलंबित प्रश्न सुटणे अशक्य झाल्याने शिक्षक आक्रमक झाले असून येत्या ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाºयांशी चर्चा करण्यासाठी बैठक ठेवण्यात आली आहे. त्यात लिखीत स्वरूपातील समस्यांचा पाढा वाचला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात शिक्षक महासंघाचे संस्थापक शेखर भोयर यांनी सांगितले, की वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. समस्या निकाली काढण्याकामी शिक्षणाधिकारी किंवा शालेय शिक्षण विभाग लक्ष देत नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने येत्या ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेदरम्यान शैक्षणिक संस्थांनी रुजू न केलेले अनुदानित अतिरिक्त शिक्षक यांच्या वेतनाचा प्रश्न, उच्च न्यायालयातून अंतरीम आदेश मिळालेल्या २००५ पुर्वी नियुक्त सर्वच शिक्षकांचे जीपीएफ खाते सुरु करणे व  डीसीपीएसमधील अडचणी, शिक्षकांचे सेवासातत्य, दुय्यम सेवा पुस्तक मिळण्यासंदर्भातील चर्चा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी व नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक व इतर सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करने,  जीपीएफच्या पावत्या मिळवून देणे, डीसीपीएसमध्ये जी कपात करण्यात आली त्याचा हिशेब मिळवून देणे, मेडिकल बिले, वरिष्ठ व निवड श्रेणीचा प्रश्न, २० टक्के अनुदानीत शाळांचा प्रश्न, १ व २ जुलै रोजीच्या शाळांचा प्रश्न, शैक्षणिक सत्र २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये नैसर्गिक वाढ मिळालेल्या तुकड्यांना अनुदान मिळवून देणे, २ मे २०१२ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचा प्रश्न, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना अनुदान तसेच इतरही काही संबंधित प्रश्नांवर शिक्षणाधिकाºयांशी चर्चा केली जाणार आहे, असे सांगून जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांच्या काही समस्या असल्यास लिखित स्वरुपात त्या सादर कराव्या, असे आवाहनही भोयर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमTeacherशिक्षक