शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस प्रारंभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 18:05 IST

वाशिम : जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस ६ मे रोजी प्रारंभ झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेस ६ मे रोजी प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे. शहरी आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. जी. हाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली मुंदडा, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. आहेर म्हणाले, क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक घटकाच्या सहकार्याची गरज असून प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून क्षयरुग्णांची माहिती द्यावी तसेच आशा कार्यकर्ती व आरोग्य सेवक, सेविका यांनी प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेदरम्यान काळजीपूर्वक काम करण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेमुळे क्षयरुग्ण नोंदणी होण्याचे प्रमाण वाढेल व क्षयरोगाबद्दल जनजागृती होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातील कर्मचारी, त्यांचे भागधारक, अशासकीय संथ तसेच सार्वजनिक आरोग्य सेवेतील कमर्चारी यांची पथके नेमून दिलेल्या भागात घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहेत. या मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यातील झोपडपट्टी परिसर, पोहोचण्यासाठी अवघड गावे आणि वस्त्या, कारागृहातील कैदी, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात अशी गावे, एचआयव्ही अतिजोखीम गट, असंघटीत कामगार, बांधकाम श्तालाच्या ठिकाणी काम करणारे कामगार, बेघर अशा निवडक भागांमध्ये क्षयरुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सुमारे २६९ पथकांद्वारे जिल्ह्यातील २६ हजार ६५८ घरांना भेटी दिल्या जाणार आहेत, असे डॉ. हाके यांनी प्रास्ताविकात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम समन्वयक समाधान लोनसुने यांनी केले, तर आभार डॉ. जिरोणकर यांनी मानले.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य