शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाकरीता तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 14:18 IST

मानधनासाठी निधी तसेच लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली आहे, अशी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निवडणूकविषयक कामकाजाच्या अनुषंगाने तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे; परंतु अनेक ठिकाणी मानधनासाठी निधीची मागणी नोंदविली नाही, तसेच काही कर्मचाºयांना लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश दिले नसल्याची बाब तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. मानधनासाठी निधी तसेच लिखित स्वरूपात नियुक्ती आदेश देण्याची मागणी मुख्य निवडणूक अधिकाºयांकडे केली आहे, अशी माहिती तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष तथा वाशिमचे मंडळ अधिकारी श्याम जोशी यांनी दिली.लोकसभा निवडणुकनिषयक कामकाज करण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून तलाठी, मंडळ अधिकाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्यवेक्षकांना मानधन व प्रवासभत्ता देय असून, यासंदर्भात तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असता, काही बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार राज्यामध्ये मनुष्यबळाची उपलब्धता व कामाची सोय या दृष्टिने पर्यवेक्षक या पदावर बहुतेक ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी संवर्गातील कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे; परंतु अद्याप काही जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी लिखित स्वरुपात, तसे आदेश पारित केले नाहीत. पर्यवेक्षकांच्या देय मानधनासाठी निधीची मागणी नोंदविलेली नाही. त्यामुळे लिखीत आदेश देण्यात यावे तसेच मानधनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाने मुख्य निवडणूक अधिकाºयांना साकडे घातले आहे. पर्यवेक्षक या पदावर बहुतेक ठिकाणी मंडळ अधिकारी व तलाठी संवगार्तील कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. परंतू, अद्याप काही जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लिखित स्वरुपात तसे आदेश पारित केले नाहीत. काही ठिकाणी पर्यवेक्षकांच्या देय मानधनाकरीता निधीची मागणी नोंदविलेली नाही. ही बाब निवेदनाद्वारे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली आहे. न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.- श्याम जोशीअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ.

टॅग्स :washimवाशिम