शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा  -  जिल्हाधिकारी मिश्रा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:06 IST

वाशिम: रस्ते अपघातांवर तसेच अपघातांमध्ये होणाºया मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रस्ते अपघातांवर तसेच अपघातांमध्ये होणाºया मृत्युंवर नियंत्रण आणण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. बी. एस. हरण, सहाय्यक परिवहन अधिकारी समरीन सय्यद, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अर्विंत राठोड, उप शिक्षणाधिकारी आर. पी. ठाकूर आदी उपस्थित होते.मिश्रा म्हणाले, रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. शिक्षण विभागामार्फत शाळा, महाविद्यालयांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्याबाबत यापूर्वीच सूचना करण्या आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन वाहनचालकांवर होणाºया कारवाईबाबत माहिती देण्यात यावी. वाहतूक नियमांविषयी जनजागृती होत असताना वाहतूक नियम मोडणाºयांविरुद्ध मोहीम सुद्धा तीव्र करण्यात यावी. तसेच वाहतूक पोलीस व परिवहन विभागाच्यावतीने संयुक्तरित्या विशेष तपासणी मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी यावेळी केल्या. रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉटवर करण्यात आलेल्या कायार्वाहीचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाईहेल्मेट न वापरणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, विमा प्रमाणपत्र नसणे, विना अनुज्ञप्ती वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, ओव्हर स्पीडिंग वाहन चालविणे, कर्कश हॉर्न वापरणे, विना नोंदणी वाहन चालविणे, ओव्हरलोडिंग वाहन चालविणे, योग्यता प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे आदी गुन्ह्यानुसार कडक कारवाई केली जाणार असल्याचे सय्यद यांनी यावेळी सांगितले. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्तीरस्ते वाहतूक सुरक्षिततेसाठी दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालयTrafficवाहतूक कोंडी