शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

तहसीलमधील महसूलचा कारभार वाऱ्यावर!

By admin | Updated: May 20, 2017 01:40 IST

नायब तहसीलदार रजेवर : कार्यरत इतर अधिकाऱ्यांवर प्रभार सोपविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे नायब तहसीलदार गेल्या आठ दिवसांपासून रजेवर असून, त्यांचा प्रभार अद्याप कुणाकडेही सोपविण्यात आलेला नाही. यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कार्यरत नायब तहसीलदारांकडे अतिरिक्त प्रभार सोपवून कामे मार्गी लावावी, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दल, या संघटनेने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे १९ मे रोजी केली आहे. या संदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी हे महत्त्वाचे पद आहे. मात्र, वाशिमच्या तहसील कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून नायब तहसीलदार रजेवर गेले असून, ते कधी परततील, याची शाश्वती नाही. यामुळे जमीन तथा इतर विविध प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. नायब तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे तालुक्यातील नागरिकांना काम न होताच परत जावे लागत आहे. उकळीपेन येथील सुमनबाई धवसे व शांताबाई भगत या ६० ते ६५ वयाच्या वृद्ध महिला गुरुवारी तलाठी अहवालासाठी पत्र मिळेल, या आशेने तहसील कार्यालयात दिवसभर थांबल्या होत्या. तहसील कार्यालयातील अधिकारी ढोके यांनी तहसीलदार अरखराव यांच्या आदेशानुसार पत्र तयार केले. मात्र, निवासी नायब तहसीलदार वानखडे व निवडणूक विभागाचे दंदी हे दोघेही हजर असताना व त्यांना स्वाक्षरी करण्याचा अधिकार असतानाही त्यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे संबंधित वृद्ध महिलांसह जनुना-सोनवळ येथील जनार्धन लोखंडे व गोदमले यांच्यासह इतर महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सायंकाळी त्यांना निराश होऊन परत जावे लागले. नायब तहसीलदारांच्या अनुपस्थितीचा फटका रोजमजुरी बुडवून कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही बसत असून, त्यांना होणारा हा त्रास रोखण्यासाठी सुटीवर गेलेल्या नायब तहसीलदाराचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्यांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली.वाशिम तहसील कार्यालयातील महसूलचे नायब तहसीलदार यांनी आजारी रजा टाकली आहे. मात्र, तीन नायब तहसीलदार कार्यरत असून, त्यांच्यापैकी एकाकडे महसूलचा अतिरिक्त कारभार सोपविला जाईल. साधारणत: सोमवारपासून नागरिकांना जाणवणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याचा तहसीलमार्फत सर्वंकष प्रयत्न केला जाणार आहे. - बलवंत अरखराव, तहसीलदार, वाशिम