वाशिम: शेतकरी कुटुंबियांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प सुरू केला. त्यानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातही प्रेरणा प्रकल्प कक्षाची स्थापना केली. मात्र, पुरेशा प्रमाणात जनजागृती नसल्याने आणि निधी खर्च करण्याबाबत गांभिर्य नसल्याने शेतकर्यांचे समुपदेशन कागदापुरतेच र्मयादीत राहण्याची भिती व्यक्त होत आहे.गत चार-पाच वर्षांपासून राज्यात निसर्गाचा लहरीपणा असल्याने दुष्काळाचे संकट आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या आणि नापिकीमुळे मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या शेतकर्यांचे समुपदेशन करण्यासाठी शासनाने प्रेरणा प्रकल्प सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्याला ४0.८४ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला. यातील २७ लाख १८ हजार रुपयाचा निधी केवळ अधिकारी, कर्मचार्यांच्या पगारावर खर्च केले जाणार असून कार्यालयीन खर्चासाठी २.४४ लाख, औषधींकरिता २.४0 लाख, पेट्रोल/डिझेलसाठी १ लाख, प्रचार-प्रसिद्धीकरिता २५ हजार आणि इतर खर्चापोटी ७.५७ लाख रुपये खर्च करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. हा निधी खर्च करण्याचे गांभिर्यदेखील प्रशासनाने दाखविले नाही. पात्रतेचे उमेदवार नसल्याने काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकर्यांना समुपदेशन मिळण्यात व्यत्यय निर्माण होत आहे.
दीड लाख शेतक-यांच्या घरांचे सर्वेक्षण!
By admin | Updated: January 28, 2016 23:06 IST