शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

आला उन्हाळा; आरोग्य सांभाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 11:56 IST

Summer Heat उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात.

वाशिम : गत तीन, चार दिवसांपासून ऊन तापत असून, नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असे सल्ला आरोग्य विभागाने दिला.उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यताही अधिक असते. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा वापर नियमित करण्यात यावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

अशी घ्यावी काळजी

  • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
  • बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, बुट व चपलाचा वापर करावा.
  • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
  • गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करू नये

  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.
  • दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
  • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

 अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे परिणामउन्हातील अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वात जास्त नुकसान होते. उन्हामुळे प्रमाणाबाहेर घाम आल्यास, घामातील खारट द्रवामुळे धर्मग्रंथींची नलिका सुजते व त्यातून होणारा घामाचा प्रवाह बंद होतो. त्यामुळे साठून राहण्याºया घामाचा दबाव वाढून ग्रंथी फुटतात व त्यातून घामोळे तयार होते. प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे, व्रण उठणे आदी दुष्परिणाम जाणवतात.  कडक ऊन तापत असल्यामुळे आणि उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. अशक्तपणा, डोकेदुखी, ताप येणे, चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. अनिल कावरखेवैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम  उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम आल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचे त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ. विठ्ठल गोटे,त्वचारोग तज्ज्ञ, वाशिम

टॅग्स :washimवाशिमTemperatureतापमान