मानोरा : तालुक्यातील धानोरा बु. येथील महिला छायाबाई दिपक शिंदे (वय ३५ वर्षे) या महिलेने सोमवार, १ मे रोजी राहत्या घरी सकाळी ७ वाजता गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी फिर्यादी प्रकाश शामराव कुऱ्हाडे यांच्या तक्रारीवरुन मानोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर महिलेने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, ते कळू शकले नाही. याप्रकरणाचा अधिक तपास बिट जमादार शिवा राठोड, इश्वर बाकल करीत आहेत.
महिलेची गळफास घेऊन आत्महत्या!
By admin | Updated: May 2, 2017 00:43 IST