शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटातील यशस्वी महिलांचा स्वातंत्र्यदिनी होणार सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:04 IST

यशस्वी होणाऱ्या बचत गटातील महिलांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप २०१८’ धोरणानुसार महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्र’ ही योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत महिला बचत गटांना तालुका व जिल्हास्तरावर मंच उपलब्ध करून देवून उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यात यशस्वी होणाऱ्या बचत गटातील महिलांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान होणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक प्रांजली बारस्कर यांनी दिली.राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एनआरएलएम), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन केलेल्या व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसूत्रीचे पालन करणारे महिला बचत गटांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे. तालुकास्तरावरील गटांना नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुकास्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात येईल. ही संकल्पना उद्योगात रुपांतरीत करण्यासाठी तालुकास्तरावर मार्गदर्शन व सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल.या संकल्पनेचे परीक्षण शासन निर्णयानुसार करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर समिती गठीत करण्यात येवून प्रत्येक तालुक्यातून १० नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रत्येक महिला बचत गटास ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल. तसेच जिल्हास्तरावर निवड करण्यात येणाºया १० बचत गटांना २ लाख रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिम