शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाचे विषय हे समाज उपयुक्त असावे -  प्राचार्य डॉ. सुभाष गवई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:40 IST

कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले .

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ते स्थानिक श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय राज्यशास्त्र व संशोधन विभागाच्यावतीने  आयोजित संशोधन पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये संशोधन प्रवृत्ती वाढीस लागावी व शास्त्रशुद्ध संशोधन प्रणालीच्या आधारावर संशोधन करण्याची सवय संशोधक, प्राध्यपकांना लागावी यासाठी राज्यशास्त्र तसेच संशोधन विभागाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी आपल्या पुढील मार्गदर्शनात संशोधन पद्धतीवर मार्गदर्शन करतांना, संशोधन पद्धतीनुसार शोधप्रबंध तसेच शोध निबंधाला शास्त्रीय मान्यता मिळविण्यासाठी त्याचे लिखाण कसे असले पाहिजे, संशोधन विषयाचे शिर्षक पॉइंटेड असावा तसेच तो विषय सुक्ष्मपातळीवर असला पाहिजे, विषय निवडीनंतर त्याचा उद्देश व्याप्ती निश्चित असली पाहिजे, कोण, कसा, कुठे काय, केव्हा या पाच क च्या आधारावर आपले संशोधन आधारित असले पाहिजे, संशोधनासाठी किमान पाच गृहितके तयार करणे आवश्यक आहे कारण गृहितके हा संशोधनाचा कणा आहे. तीन गृहितके सकारात्मक आणि दोन गृहिते नकारात्मक असणे आवश्यक आहे. तसेच संदर्भ देण्याच्या पद्धतीबाबतील बारकावे काय आहेत या मुद्यावर पॉवर पॉंइन्ट प्रेझेन्टेशनद्वारे विस्तृत विवेचन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक, संचालन व आभार डॉ. अशोक जाधव यांनी मानले.सदर कार्यशाळेस महाविद्यालयातील शिक्षक डॉ.संतोष खंडारे डॉ. अशोक जाधव, उमेश कुºहाडे, डॉ. योगेश पोहोकार, प्रा. पराग गावंडे, प्रा.संजय कापशीकर, प्रा. नितेश थोरात, प्रा.दिलीप वानखेडे, डॉ. अर्चना गुल्हाणे,प्रा.शुभांगी जयस्वाल उपस्थित होते. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा