शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित वसतिगृहांमधील असुविधांमुळे विद्यार्थी त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:10 IST

जिल्ह्यातील वसतिगृहांना सध्या आर्थिक टंचाईने ग्रासले असून, शासनाकडून पाठविल्या जाणार्‍या कपडे ठेवण्याच्या पेट्या, ताट-वाटी, गादी यासह इतर साहित्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने संस्थाचालकांसह विद्यार्थीही त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देसमाजकल्याणचे दुर्लक्षअनुदान मिळण्यासही होतोय विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ग्रामीण भागातील तथा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी त्यांची राहण्याची, जेवणाची सोय व्हावी, या उद्देशाने सन १९२२ पासून राज्यभरात शासकीय अनुदानित मागासवर्गीय वसतिगृहे चालविली जातात; मात्र जिल्ह्यातील वसतिगृहांना सध्या आर्थिक टंचाईने ग्रासले असून, शासनाकडून पाठविल्या जाणार्‍या कपडे ठेवण्याच्या पेट्या, ताट-वाटी, गादी यासह इतर साहित्यांचा दर्जा निकृष्ट असल्याने संस्थाचालकांसह विद्यार्थीही त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.समाज कल्याण विभागाकडून जिल्ह्यात ५८ ठिकाणी निवासी वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्याना सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि सायंकाळचे जेवण, ग्रंथालयीन सुविधा, वर्षभरात दोन गणवेश, क्रमिक पाठय़पुस्तके, वह्या, स्टेशनरी यासह इतर सुविधा पुरविण्यात येतात. यासाठी तद्वतच वसतिगृहांवर आवश्यक वॉचमॅन, स्वयंपाकी, अधीक्षकांच्या पगारावर होणार्‍या खर्चापोटी दरवर्षी जुलै महिन्यात ६0 टक्के अग्रीम रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. यंदा मात्र नोव्हेंबर महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही ३0 पेक्षा अधिक वसतिगृहांना निधी मिळालेला नाही. याशिवाय शासनाकडून पाठविले जाणारे साहित्यदेखील निकृष्ट दर्जाचे असल्याने संस्थाचालकांसोबतच विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत. 

वसतिगृहांमध्ये पुरेशा सुविधा पुरवा- ‘अभाविप’सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या वाशिम येथील शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील समस्या दूर करून विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने २0 नोव्हेंबर रोजी जि.प. समाजकल्याण  अधिकार्‍यांकडे केली. सदर वसतिगृहातील पंखे नादुरुस्त असून, शौचालय व बाथरुममध्ये विजेची व्यवस्था नाही. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची नियमित स्वच्छता होत नाही. विद्यार्थ्यांना नियमानुसार जेवण दिले जात नाही. या सर्व समस्यांमुळे विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. येत्या दहा दिवसात या समस्या दूर न झाल्यास ‘अभाविप’च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

जिल्ह्यातील मागासवर्गीय वसतिगृहांना देय असलेल्या रकमेचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, जुलैमध्ये देय असलेलेली ६0 टक्के अग्रीम रक्कम बहुतांश वसतिगृहांना देण्यात आली आहे. उर्वरित ४0 टक्के निधी मार्च २0१८ मध्ये दिला जाईल. याशिवाय शासनाकडून पाठविल्या जाणार्‍या साहित्यांबाबतही वसतिगृह संचालकांनी समाजकल्याण विभागाकडे रितसर तक्रारी दाखल कराव्यात. त्या शासनाकडे पाठवून निराकरण केले जाईल. - अमोल यावलीकरसमाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :Schoolशाळा