शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वर्गात जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जावे लागते चिखल तुडवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:26 IST

मंगरुळपीर  :  मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार पार ढासळला असून शाळेच्या परिसरात आल्यानंतर वर्गात जाण्याकरिता चिखल तुडवित मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या बाजुला जि.प.कनिष्ठ महाविद्यालय आहे. संपूर्ण खोल्यामध्ये घाण व कचरा साचलेला असुन दोर खिडक्यांची तावदाणे तुटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर  :  मंगरुळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळेचा कारभार पार ढासळला असून शाळेच्या परिसरात आल्यानंतर वर्गात जाण्याकरिता चिखल तुडवित मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. याबाबत मात्र कोणालाही काही देणे घेणे दिसून येत नसल्याने विद्यार्थ्यांनी  बिरबलनाथ स्पोर्ट  क्लबच्या अध्यक्षांना व सदस्यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार क्लबच्या अध्यक्षांनी व सदस्यांनी आक्रमक होत थेट गटविकास अधिकाºयांचे कार्यालय गाठुन त्यांना सदर प्रश्न निकाली काढण्याची मागणी निवेदनातून केली आहे.मंगरुळपीर शहरातील तालुका क्रीडा संकुलाच्या बाजुला जि.प.कनिष्ठ महाविद्यालय आहे. तेथील विद्यार्थ्यांनी बिरबलनाथ स्पोर्ट क्लबच्या सदस्यांना शाळेतील अडचणीची माहिती दिली. यावेळी सदस्यांनी शाळेत जावुन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असता तेथे प्रचंड दुरावस्था आढळली. विद्यार्थ्यांच्या वर्ग खोल्या मध्ये जाण्या येण्यासाठी रस्ता नाही.  विद्यार्थ्यांना चिखल तुडवत जावे लागते. वाढलेल्या गवतामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे. बसण्याचे बाक तुटलेल्या अवस्थेत आहेत. संपूर्ण खोल्यामध्ये घाण व कचरा साचलेला असुन दोर खिडक्यांची तावदाणे तुटली आहे. छत गळत आहेत. तसेच येथे नुकतीच टायपिंगची परिक्षा झाली होती.त्याचा  कचरा सुध्दा साफ केलेला नाही . मुलीकरिता स्वच्छतागृह नाही, त्यामुळे त्यांची कुचंबना होत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. या इमारतीच्या आवारातच बाहेरील व्यक्ती शौचास बसतात, त्यामुळे सर्वीकडे दुर्गंध  येत आहे. वर्ग ११ व १२ वी करिता एकच शिक्षीका  असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर ताटकळत बसावे लागते. जिवशास्त्र, भौतीक शास्त्र, गणीत या विषयांकरिता शिक्षक नाहीत. म्हणुन विद्यार्थ्यांच्या या समस्या ताबडतोब सोडुन त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवुन द्यावा असे बिरबलनाथ क्लबचे अध्यक्ष सुनिल मालपाणी व सदस्यांनी येथील गटविकास अधिकारी खैरे, गटशिक्षणाधिकारी कौसल व शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे. तसेच चोवीस  तासाच्या आत विद्यार्थ्यांची समस्या मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाने दुर केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बिरबलनाथ स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष सुनिल मालपाणी व सर्व सदस्यांनी वरिष्ठ अधिकाºयांना दिला आहे.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाMangrulpirमंगरूळपीर