शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या दिरंगाईमुळे नवोदयच्या परिक्षेपासून विद्यार्थी वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:17 IST

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जि. प. शाळेच्या शिक्षकांना अर्ज सादर करण्याचा विसर पडल्याने या शाळेतील विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेपासून वंचित राहिले आहेत.

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या परिक्षेस विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज सादर करण्याचाच विसर पडला. अर्ज करण्याची मुदत निघून गेली आणि यामुळेच संबंधित शाळेतील गुणंवत विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेला मुकणार आहेत. या प्रकाराची चौकशी करून संबंधित सर्व शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जि. प. शाळेच्या शिक्षकांना अर्ज सादर करण्याचा विसर पडल्याने या शाळेतील विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेपासून वंचित राहिले आहेत. या गंभीर प्रकाराची तक्रार पालकांनी जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकाºयांकडे केली असून, याची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  जिल्हा परिषदेच्या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, त्यांचा शैक्षणिक खर्च वाचावा, या उद्देशाने शासनाच्यावतीने नवोदय शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांत प्रवेशासाठी पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेण्यात येते. त्यासाठी शाळांना नवोदयकडे अर्ज सादर करावे लागतात. यंदाही ही प्रक्रिया पार पडली; परंतु  मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना या परिक्षेस विद्यार्थ्यांना बसविण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज सादर करण्याचाच विसर पडला. त्यामुळे अर्ज करण्याची मुदत निघून गेली आणि यामुळेच संबंधित शाळेतील गुणंवत विद्यार्थी नवोदयच्या परिक्षेला मुकणार आहेत. शिक्षण विभाग आणि जोगलदरी शाळेतील शिक्षकांचा बेजबाबदारपणा आणि दिरंगाईच या गंभीर प्रकाराला कारणीभूत असल्याचा आरोप पालकवर्गातून होत असून, या प्रकाराची चौकशी करून संबंधित सर्व शिक्षकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाºयांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सरदार राठोड यांच्यासह इतर पालकांनी ही तक्रार केली असून, याची दखल न घेतल्यास येत्या १० जून रोजी मंगरुळपीर-मानोरा मार्गावर जोगलदरी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर