शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीची प्रतीक्षा, समाज कल्याण व शिक्षण विभाग अनभिज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 17:50 IST

शेकडो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २ वर्षांपासून मिळालीच नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करून पुढील शिक्षण घेणे त्यांना अवघड जात आहे.

वाशिम: जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती २ वर्षांपासून मिळालीच नाही. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करून पुढील शिक्षण घेणे त्यांना अवघड जात आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली असल्याने शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात या योजनेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.शासन दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी त्यांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण करते, तर त्याच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्यात शिक्षण विभागही अयशस्वी ठरत आहे. जिल्ह्यातील अशा शेकडो विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीच मिळाली नाही. एकाच शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, तर त्याच शाळेतील इतर पात्र विद्यार्थी मात्र वंचित असल्याने वंचित विद्यार्थी व पालक संभ्रमात पडले आहेत.समाज कल्याण आणि शिक्षण विभागाने याची दखल घेऊन वंचित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ त्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात समाज कल्याण विभागाशी संपर्क साधला असता ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असेल त्या विद्यार्थ्यांनी रितसर तक्रार करून माहिती दिल्यास कारणांचा शोध घेऊन त्यांची शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा करता येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.