शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरखाली आल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, संतप्त जमावाकडून ट्रॅक्टरची तोडफोड

By संतोष वानखडे | Updated: October 9, 2023 19:21 IST

कामरगाव येथील घटना

संतोष वानखडे, वाशिम : ट्रॅक्टर मागे घेत (रिव्हर्स) असताना, चाकाखाली आल्याने १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील काझी प्लॉटमध्ये ९ ऑक्टोबरला सकाळी १० वाजतादरम्यान घडली. अतेमा फातेमा मुजाईद खान असे मृतक मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे कामरगाव काही काळ तणाव निर्माण झाला होता.

अतेमा फातेमा मुजाईद खान ही इयत्ता पाचवीत शिकत होती. एक ट्रॅक्टर काझी प्लॉट येथील एका घराजवळ विटा टाकण्यासाठी गेला असता रिव्हर्स घेताना हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेनंतर काही जणांनी त्या मुलीला उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तपासणी दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलीला मृत घोषित केले. दरम्यान, संतप्त जमावाने यावेळी  ट्रॅक्टरची तोडफोड केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कामरगाव चौकीतील पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून मुलीची सायकल व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस चौकी परिसरात लावण्यात आले. या घटनेचा अधिक तपास धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात कामरगाव चौकीतील पोलीस करीत आहेत.परिस्थिती नियंत्रणात

या दुर्देवी घटनेमुळे संतप्त जमावाने ट्रॅक्टरची तोडफोड केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

टॅग्स :Accidentअपघात