शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

'जलयुक्त'च्या प्रलंबित कामांसाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:33 IST

प्रलंबित कामे पाणलोटच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती किंवा स्थानिक निधीतून करावी लागणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी विशेष निधी बंद केला आहे. त्यामुळे या योजनेतील प्रलंबित कामे पाणलोटच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती किंवा स्थानिक निधीतून करावी लागणार आहेत. अमरावती विभागात ही कामे करण्यासाठी नियोजन सुरू आहे.अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात कृषी, वनविभाग, सामाजिक वनीकरण, जि.प. लघू सिंचन, जलसंधारण, भुजल विकास यंत्रणा, पंचायत समित्या, लोकसहभाग ग्रामीण पाणी पुरवठासह इतर संस्थांतर्गत मिळून २०१८-१९ मध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंदाजे ३२०.६३ कोटी रुपये खर्चाची २० हजार ५१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यात या कामांवर २८१ कोटी ११ लाख खर्च अपेक्षीत होता. यातील १९९७३ कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आणि १९ हजार २५८ कामांना सुरुवात करण्यात आली. तथापि. निर्धारित मुदतीत १८ हजार ७५१ कामे पूर्ण करण्यात आली, तर ५४७ कामे प्रलंबित आहेत. यात अकोला जिल्ह्यातील २३७, यवतमाळ जिल्ह्यातील ९४, तर बुलडाणा जिल्ह्यातील २१६ कामांचा समावेश आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात प्रस्तावित केलेल्या कामांपैकी प्रलंबित असलेली २७५ कामे पूर्ण होणे अशक्य असल्याने ती रद्द करण्यात आली, तर उपरोक्त प्रमाणे अकोला यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती किंवा स्थानिक निधीतून करावी लागणार आहेत. यात कृषी विभागाकडे प्रलंबित असलेली १२६ कामे पाणलोट विकास कार्यक्रमातून करण्यासाठी प्रस्ताव तयार करून कृषी सचांलक पुणे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे, तर इतर विभागांनाही त्यांच्या वरिष्ठस्तरावर प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. यासाठी विभागीयस्तरावर नियोजन करण्यात येत आहे.कृषी विभागांतर्गत प्रलंबित असलेली जलयुक्त शिवार अभियानाची कामे पाणलोट विकास अंतर्गत पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी कृषी सचांलकांकडे प्रस्ताव पाठवून सुकाणू समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन सुरू आहे.- एस. एम. तोटावारविभागीय अधीक्षक कृषी अधिकारी(एमआरईजीएस)

 

टॅग्स :washimवाशिमJalyukt Shivarजलयुक्त शिवार