शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या हितासाठी सर्वंकष प्रयत्न - गजानन मल्ल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:14 IST

दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी साधलेला हा संवाद......

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सर्वात आरामदायक, किफायतशीर आणि सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे पाहिले जाते. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करित असून वाशिममधील समस्या आणि तत्सम विषयासंबंधी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी साधलेला हा संवाद......

वाशिम-पुसद मार्गावरील उड्डाणपूलाचे काम केव्हा पूर्ण होणार?- राज्यशासन आणि केंद्रीय रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त सहकार्याने सुरू असलेल्या वाशिम-पुसद मार्गावरील उड्डाणपूलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपले विशेष प्रयत्न सुरू आहेत.

वाशिम रेल्वे स्थानकावर अद्याप सीसी बसलेले नाहीत, त्याविषयी काय ?- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भातील हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. वाशिम रेल्वे स्थानकासह परिसरात आवश्यक त्याठिकाणी सीसी कार्यान्वित करण्यासंबंधीचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. यासह वाशिम रेल्वेस्थानकातील स्वच्छतेसंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रश्न निकाली काढला जाईल.

वाशिम स्थानकावरून आणखी कुठल्या गाड्या सुरू होणार ?- नागपूर-कोल्हापूर व्हाया वाशिम धावणारी तसेच अजनी-मुंबई या एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसह सिकंदराबाद, जयपूर, नांदेड, बिकानेर, गंगानगर या सर्व एक्सप्रेस गाड्या दररोज सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याशिवाय नागपूर-औरंगाबाद डेली इंटरसिटी सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. वाशिमवरून धावणाऱ्या गंगानगर-जयपूर-बिकानेर या एक्सप्रेस रेल्वेला शेगाव येथे थांबा देण्यासाठी भुसावळ रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. हे शक्य झाल्यास संतनगरी शेगाव येथील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांची सोय होणार आहे.

अकोला-खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम कधी पूर्ण होणार ?- अकोला ते खंडवा या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम गतीने सुरू असून अकोला ते अकोट यादरम्यानचा मार्ग देखील तयार झाला आहे. त्याची पाहणी व चाचपणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सदर मार्गावर असलेल्या अकोट रेल्वे स्थानक तयार करण्याचे काम सद्या प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर अकोला ते अकोटपर्यंतच्या रेल्वेमार्गाची पुन्हा चाचणी घेण्यात येईल. अकोट ते खंडवा हा रेल्वेमार्ग ‘टायगर झोन’मुळे अडचणीत सापडला आहे. पर्यावरण विभागाची त्यास मंजूरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमrailwayरेल्वेinterviewमुलाखत