शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

रहदारीस अडथळा ठरू पाहणाऱ्या हातगाड्यांवर धडक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 15:04 IST

वाशिम : ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणारा पाटणी चौक ते शिवाजी चौक हा मार्ग रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, अन्य साहित्य विक्री करणारे लघुव्यावसायिक आणि फळविक्रेत्यांनी गिळंकृत केला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘हार्ट आॅफ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणारा पाटणी चौक ते शिवाजी चौक हा मार्ग रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, अन्य साहित्य विक्री करणारे लघुव्यावसायिक आणि फळविक्रेत्यांनी गिळंकृत केला. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी दैनंदिन वाहतूक विस्कळित होण्यासोबतच रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. यासंबंधी ‘लोकमत’ने भाजीविक्रेत्यांचा प्रमुख रस्त्यावरच ठिय्या, या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेवून शहर वाहतूक विभागाने रविवारी धडक कारवाईची मोहिम हाती घेतल्याचे दिसून आले.जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरातील आठवडी बाजार हटवून तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच भरविला जावा, अशा सक्त सूचना साधारणत: १० वर्षांपूर्वी सर्व व्यावसायिकांना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. रविवारच्या आठवडी बाजाराशिवाय रोजच पाटणी चौक ते शिवाजी चौक या शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला बसून भाजीविक्री आणि अन्य साहित्य विक्री करण्यासोबतच फळविक्रेते व्यावसायिक आपल्या हातगाड्याही अगदीच रस्त्याच्या मधोमध उभ्या करित असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासंबंधी ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेवून शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक विनायक जाधव यांच्या नेतृत्वात अन्य वाहतूक कर्मचाºयांनी कारवाईची धडक मोहिम हाती घेवून वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. नगर परिषदेची भुमिका संतापदायकरहदारीस अडथळा ठरू पाहणारे अतिक्रमण हटविणे, ते पुन्हा होवू नये यासाठी प्रयत्न करणे, शहरांतर्गत वाहतूक सुरळित ठेवणे आदींकडे वास्तविक पाहता नगर परिषदेने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. मात्र, नगर परिषदेचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असून रविवारी शहर वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू असताना त्याठिकाणी नगर परिषदेचा एकही कर्मचारी हजर नव्हता. पालिकेच्या या भुमिकेप्रती अनेकांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी