शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! लग्नास नकार दिल्यानं युवतीला जिवंत जाळलं; उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:29 IST

लग्न करण्यास नकार दिल्याने एका १८ वर्षीय युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देआरोपी रवी भगवान भालेराव (२१) याने गावातील १८ वर्षीय मुलीला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत, त्या मुलीच्या घरात प्रवेश केला.पिडीत मुलीने त्याला नकार दिला. हा राग मनात धरून आरोपीने अंगावर रॉकेल टाकून सदर मुलीला जाळले. सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरु असताना पिडीत तरुणीचा मृत्यू झाला. 

अनसिंग : लग्न करण्यास नकार दिल्याने एका १८ वर्षीय युवतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना १९ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान, अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरु असताना पिडीत तरुणीचा मृत्यू झाला. अनसिंग पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी येथील आरोपी रवी भगवान भालेराव (२१) याने गावातील १८ वर्षीय मुलीला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत, त्या मुलीच्या घरात प्रवेश केला. माझ्या आई-वडीलांच्या संमतीने मला लग्न करावयाचे आहे, असे म्हणून पिडीत मुलीने त्याला नकार दिला. हा राग मनात धरून आरोपीने अंगावर रॉकेल टाकून सदर मुलीला जाळले. पीडितेच्या जबाबावरुन अनसिंग पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवी कलम ४५२, ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले. मुलीला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरु असताना पिडीत तरुणीचा मृत्यू झाला. सदर घटना एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची चर्चा आहे. पुढील तपास अनसिंग ठाणेदार करीत आहेत. (वार्ताहर)लग्नासाठी बळजबरी..!गावातील रवी नामक युवक हा लग्नासाठी तिला नेहमी गळ घालत होत. लग्नाची जबरदस्त करत होता. परंतु आपण आपल्या आईवडीलांच्या मर्जीनुसार लग्न करणार आहे, ते म्हणतील त्या मुलासोबत लग्न करणार असल्याची ठाम भूमिका तिने त्या युवकाला सांगितली होती. पंरतु तो मात्र ऐकण्यास तयार नव्हता. १९ जुन रोजी घरी कोणी नसतांना या युवकाने तिच्या घरात प्रवेश केला आणि लग्न करण्याची जबरदस्ती करु लागला. तिने पुन्हा आपली भूमिका स्पष्ट करताच, त्याने रागाच्या भरात सदर पीडित युवतीला जिवंत पेटवून दिले आणि तो फरार. घरच्यांनी तिला अनसिंग येथे रुग्णालयात नेले. तेथून तिला वाशिम व नंतर अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हा