शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही कर्मचारी संपावर; कामकाज प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:13 IST

वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८  आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले.

ठळक मुद्देप्रशासकीय कामकाज ठप्प पडले असून, आरोग्य सेवेवरही या संपाचा परिणाम जाणवत आहे.जिल्ह्यातील सहाही तहसिल व पंचायत समिती कार्यालयासमोर मंडप टाकून कर्मचाºयांनी संपात सहभागी नोंदविला.शिक्षक या संपात सहभागी असल्याने दुसºया दिवशीही जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८  आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी सहभागी झाले. यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प पडले असून, आरोग्य सेवेवरही या संपाचा परिणाम जाणवत आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करावी, पाच दिवसाचा आठवडा करावा, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने ७, ८ व ९ आॅगस्ट दरम्यान राज्यव्यापी संप पुकारला आहे. ८ आॅगस्ट रोजी या संपात जिल्ह्यातील महसूल विभागातील २९९ कर्मचारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जवळपास २२५० कर्मचारी, नगर परिषदेचे जवळपास ३५० कर्मचारी, जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक संघटनेचे जवळपास ४५० शिक्षक, आयटीआयचे जवळपास ५० कर्मचारी, शिक्षकेतर संघटनेचे जवळपास ६५० कर्मचारी, आरोग्य विभागातील जवळपास २०० परिचारिका या संपात सहभागी झाल्याचा दावा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष तात्याराव नवघरे यांनी केला.जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्ह्यातील सहाही तहसिल व पंचायत समिती कार्यालयासमोर मंडप टाकून कर्मचाºयांनी संपात सहभागी नोंदविला. जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य सेवेवर या संपाच परिणाम जाणवला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून तहसिल कार्यालय व निवडणूक विभागाने १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केलेली आहे. या संपामुळे ७ आॅगस्टपासून निवडणूकविषयक कामकाजही ठप्प पडल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद शिक्षकांच्या दोन संघटनेचे शिक्षक या संपात सहभागी असल्याने दुसºया दिवशीही जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद होत्या. ग्रामसेवक संघटनाही या संपात सहभागी असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज प्रभावित झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या परिचारिका, आरोग्य सेवक, अभियंता संघटनेने या संपाला पाठिंबा म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केले. संपामुळे बहुतांश कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीStrikeसंप