शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

डव्हा यात्रा महोत्सवाची सांगता; २00 क्विंटल महाप्रसादाचे ५0 ट्रॅक्टरद्वारे वितरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:30 IST

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज संस्थान येथील भव्य यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने झाली. ५0 ट्रॅक्टरद्वारे २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले. 

ठळक मुद्देयात्रेत भाविकांची मांदियाळी

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज संस्थान येथील भव्य यात्रा महोत्सवाची सांगता २४ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने झाली. ५0 ट्रॅक्टरद्वारे २00 क्विंटल महाप्रसादाचे वितरण भाविकांना करण्यात आले. विदर्भाची पंढरी म्हणून डव्हा संस्थांचा उल्लेख केल्या जातो. दरवर्षी रथसप्तमीला भव्य यात्रेचे आयोजन असते. नाथ नंगे महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. या यात्रेची सुरुवात १८ जानेवारी रोजी झाली  होती. २४ जानेवारीला यात्रोत्सवाची सांगता झाली.   ७५ क्विंटलपुरी, १५   क्विंटलची बुंदी, ५0 क्विंटलची भाजी  असा महाप्रसाद जवळपास एक लाख भाविकांना ट्रॅक्टरच्या साहाय्याने वितरित करण्यात आला. जवळपास दोन हजार स्वयंसेवकांनी सहकार्य केले. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर श्री नाथ नंगे महाराज व विश्‍वनाथ महाराज यांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक  करण्यात आला. त्यानंतर आरती करण्यात आली. दुपारपयर्ंत विविध धार्मिक कार्यक्रम, यज्ञ झाल्यानंतर वाजतगाजत पालखी सोहळा पार पडला. मंदिरापासून पालखी निघून दुपारच्या सुमारास १२ एकर जमिनीवर भाविकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. ध्वजारोहण झाल्यानंतर  फटाक्यांची आतषबाजी करीत महाराजांच्या नावाचा एकच गजर करीत महाप्रसाद वितरण करण्यात आले. विदर्भ, मराठवाडा, खान्देशसह राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांसह जवळपास एक लाख भाविक डव्हा येथे दाखल झाले होते.यावेळी आमदार अमित झनक, श्यामसुृंदर मुंदडा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, तहसीलदार राजेश वझिरे, जिल्हा परिषदेचे सभापती विश्‍वनाथ सानप, जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे, सेवाराम आडे, नायब तहसीलदार राठोड, गोपाल पाटील राऊत, विश्‍वंभर नवघरे, सुभाष घुगे, उल्हास घुगे,  संस्थानचे  विश्‍वस्त तथा अध्यक्ष बाबूराव माणिक घुगे, ज्ञानेश्‍वर खरबडे, डॉ. निवास मुंढे, सुरेश घुगे, सीताराम खानझोडे, नारायण घुगे, प्रभुराव घुगे, गोवर्धन राऊत, कैलाश देशमुख, अजयसिंग राजुरकर, दिलीप वाघ, सुभाष घुगे, गोविंद पुरोहित, पुरुषोत्तम देवळे आदी मान्यवर उपस्थित होते. यात्रा महोत्सवादरम्यान विश्‍वजीवन ग्रंथाचे पारायण, हरिकीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात्रा महोत्सवात रोगनिदान शिबिर, जागृती शिबिर पार पडले. 

महाप्रसाद वितरणासाठी शिस्तबद्ध नियोजनमहाप्रसाद वितरणासाठी संस्थानने शिस्तबद्ध नियोजन केले होते. यात्रा महोत्सवाच्या आयोजनासाठी संस्थानचे अध्यक्ष बाबूराव घुगे, विश्‍वस्त डॉ. निवासराव मुंढे, गोवर्धन महाराज , सुरेश घुगे , ज्ञानेश्‍वर खरबडे ,प्रभुराव घुगे यांच्यासह अँड. सुभाष घुगे आदींनी परिश्रम घेतले.  दरम्यान, या यात्रोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत सप्ताह व विश्‍वजीवन ग्रंथ सामुदायिक पारायणास  झाले. यात्रा महोत्सवात गायत्री जप, श्री विश्‍वनाथ महाराजकृत अभिषेक व हवन वेदशास्त्र संपन्न शशिकांत देव यांच्या आचार्यत्वाखाली झाले.  नारायण महाराज खडकीकर यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत वाचन करण्यात आले. हरिनाम सप्ताह सीताराम महाराज खानझोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. श्री विश्‍वजीवन ग्रंथ व्यासपीठ, गोवर्धन महाराज राऊत यांनी सांभाळले.  या भागवताच्या समाप्तीनिमित्त सीताराम महाराज खानझोडे आसेगाव पेन यांचे काल्याचे कीर्तन झाले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने २४ जानेवारीला प्रकाशित केलेल्या ‘तुझे तुलाच’ या विशेष पानाचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.ं

टॅग्स :washimवाशिम