शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इंझोरीतील साठवण तळ्याचे काम अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:46 IST

या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. 

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम): राज्यशासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून इंझोरी येथे सन २०१८-१९ मध्ये साठवण तळे मंजूर झाले; परंतु हे साठवण तळे पूर्ण होऊ शकले नाही. आता या अर्धवट तळ्यात लाखो लिटरचा जलसाठा होत असल्याने भूजल पातळीला आधार झाला असला तरी, या तळ्यात गुरे पडण्याची भीती असल्याने पशूपालकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात  २०१८-१९ मध्ये सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत पाणलोटाची अनेक कामे करण्यात आली. त्यात नाला खोलीकरण, नदी खोलीकरण सलग समतल चर, नालाबांधासह जवळपास ४८  साठवण तळेही प्रस्तावित करण्यात आले होते. या कामांसाठी बीजेएसने आवश्यकतेनुसार जेसीबी, पोकलन मशीन उपलब्ध करून दिल्या, तर शासनाकडून इंधनाचा खर्च देण्यात येत होता; परंतु साठवण तळ्यांचे खोदकाम शासनाच्या निर्धारित इंधन दरात पूर्ण होणे कठीण असल्याने अनेक ठिकाणचे तळे अर्धवटच राहिले. त्यात इंझोरी येथील तळ्याचाही समावेश होता. तब्बल शंभर चौरस मीटर आकार आणि तीन मीटर खोल अशा स्वरूपाच्या तळ्याचे काम कृषी विभागाने सुरू केले. चारही बाजूनी दोन मीटर रुंद आणि तीन मीटर खोल नाल्या खोदल्यानंतर मात्र इंधन दराची अडचण निर्माण झाल्याने हे तळे अर्धवटच राहिले. तथापि, त्याच वर्षी पावसाळ्यात या अर्धवट शेततळ्यात लाखो लिटरचा जलसाठा झाला. त्यामुळे परिसरातील भूजल पातळीसह विहिरींच्या पातळीतही वाढ झाल्याने शेतकºयांना यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत सिंचनास आधार झाला. तथापि, या साठवण तळ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांत गुरे पडण्याच्या घटनाही घडू लागल्या. त्यामुळे पशूपालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.   महामार्गाच्या माध्यमातून काम करण्याची मागणी जिल्ह्यात समृद्धी महामार्गासह विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील गौण खनिजाची पूर्तता करण्यासाठी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यात शंभर चौरस मीटर आकाराचे साठवण तळेही झाले असून, त्याचा फायदा संबंधित गावातील शेतकºयांना होत आहेच शिवाय भूजल पातळी वाढून पाणीटंचाईचा प्रश्नही मिटला आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या कारंजा-मानोरा महामार्गाच्या माध्यमातून या साठवण तळ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी इंझोरी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम