शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाशिम जिल्ह्यात आधार नोंदणी बंद, नागरिक अडचणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:45 IST

वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत.

ठळक मुद्दे १७ जुलैपासून जिल्ह्यात आधार नोंदणी बंद असल्याने विविध कामांसाठी आधार नोंदणी करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. मराठा आरक्षणाच्या फॉर्मचे कमीशन, राजीव गांधी जीवनदायी कार्ड वाटपाचे कमीशन आणि मागील सत्रात आधार कार्डसाठी करार करण्यात आला होता. अनेक व्यक्ती यासाठी आधार केंद्रावर येत असले तरी, नोंदणीच बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे १७ जुलैपासून वाशिमजिल्ह्यात आधार नोंदणी बंद असल्याने विविध कामांसाठी आधार नोंदणी करणाºयांची मोठी पंचाईत झाली आहे. ठिकठिकाणच्या आधार कें द्रांवर नागरिक चौकशी करून निराशेने परत जात आहेत. महा आॅनलाईन कंपनीकडून कर्जमाफीच्या अर्जांचे कमीशन, मराठा आरक्षणाच्या फॉर्मचे कमीशन, राजीव गांधी जीवनदायी कार्ड वाटपाचे कमीशन आणि मागील सत्रात आधार कार्डसाठी करार करण्यात आला होता. त्यासाठी ५० हजार रुपये अनामत रक्कम भरण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्र चालकांनी आधार नोंदणीचे काम करण्यास नकार दिला होता. यावेळी ५० हजार रुपये अनामतीची अट शिथील केल्यानंतर सर्वत्र पुन्हा आधार नोंदणी सुरू झाली; परंतु आता पुन्हा आधार नोंदणीसाठी केंद्र चालकांना ही अट ठेवण्यात आली आहे. त्यातच ७/१२ बंद केल्याने केंद्र चालकांच्या रोजंदारीत मोठी घट झाली आहे. आता ५० हजार रुपये अनामत न भरल्यास आधार मशीन बंद करून कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधीत यंत्रणेकडून सांगण्यात आले. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रधारकांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाºयांकडे निवेदन सादर करून ५० हजार रुपये अनामतीची जाचक अट रद्द करण्याची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही दिला;परंतु त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे १७ जुलै रोजीच जिल्ह्यातील ५४ आधार केंद्रधारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्या. त्यामुळे जिल्हाभरात आधार नोंदणी बंद झाली असून, आधार कार्ड नसलेले विद्यार्थी, निराधार लाभार्थींसह इतर नागगरिकांची मोठी पंचाईत झाली आहे.   पॅनकार्डधारक, विद्यार्थ्यांची गोचीसध्या सर्वत्र शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. शिष्यवृत्ती ही बँकखात्यावर जमा होते आणि बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. अद्यापही अनेक विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही. त्यामुळे त्यांना आधार नोंदणी करून मुदतीच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे; परंतु आधार नोंदणीच बंद असल्याने या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली असून, निर्धारित मुदतीत केवळ आधारअभावी अर्ज सादर करणे शक्य झाले नाही, तर त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्याशिवाय पॅनकार्डवरील जन्मतारखेसाठी आधार आवश्यक असून, विविध कामांसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने अनेक व्यक्ती यासाठी आधार केंद्रावर येत असले तरी, नोंदणीच बंद असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्ड