शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बनावट क्रमांकाद्वारे चोरीची वाहने धावताहेत रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 12:17 IST

Washim News एकाच क्रमांकाची दोन वाहने जिल्ह्यात धावत असल्याचे समोर आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : बनावट क्रमांकाद्वारे चोरीची वाहने जिल्ह्यात धावत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. वाहतूक नियम न पाळल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाने दंड ठोठावल्यानंतर संबंधित वाहनाच्या मूळ मालकाला मोबाइलवर संदेश मिळतो. या संदेशातून एकाच क्रमांकाची दोन वाहने जिल्ह्यात धावत असल्याचे समोर आले आहे.वाहन खरेदीनंतर परिवहन विभागाकडून वाहनाला क्रमांक दिला जातो. यामुळे चोरीची वाहने रस्त्यावर धावणार नाही, अशी अपेक्षा असते. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने दंड वसूल केला जात होता. गत पाच महिन्यांपासून दंड वसूली पद्धतीला ऑनलाईनची जोड देण्यात आली. वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकावर कारवाई केल्यानंतर वाहन मालकाला ऑनलाईन पद्धतीने मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविले जातात. या संदेशातून बनावट क्रमांकाची वाहने रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीदेखील हा प्रकार समोर आला असता, उपप्रादेशिक परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आता परत एकाच क्रमांकाची दोन वाहने रस्त्यावर धावत असल्याचे समोर आले. एमएच ३० ए,झेड ५८९८ क्रमांकाचे अकोला जिल्हातील वाहन हे गत एका महिन्यात वाशिम जिल्ह्यात आलेले नसतानाही, दंड आकारल्याचा संदेश मोबाइलवर प्राप्त झाला, असे वाहन मालक संजय तायडे यांनी सांगितले. यापूर्वीदेखील एकाच समान क्रमांकाचे दोन वाहने जिल्ह्यात धावत असल्याचे समोर आले होते. यामुळे जिल्ह्यात चोरीची वाहने धावत तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आतापर्यंत चार जणांच्या मोबाइलवर असे संदेश आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चाैकशी करणे गरजेचे ठरत आहे. एका वाहनाला एकच क्रमांक दिला जातो. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन वाहने असतील, तर या प्रकाराची चौकशी केली जाईल.

- ज्ञानेश्वर हिरडे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

 

एमएच ३० ए,झेड ५८९८ क्रमांकाचे वाहन वाशिम जिल्ह्यात नेण्यात आले नाही. तथापि, या वाहनाला दंड झाल्याबाबत मोबाइलवर संदेश आला आहे. त्यामुळे या क्रमांकाचा कुणी गैरवापर करून दुसरे वाहन रस्त्यावर आणले असण्याची शक्यता आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी.- संजय तायडे, वाहनमालक

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस