शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sting Operation :  ग्रामीण भागांत खुलेआम रंगताहेत जुगारांचे डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:25 IST

जोगलदरी (वाशिम): परिसरातील ग्रामीण भागांत गावातील चावडीच्या ठिकाणी खुलेआम पैशांवर जुगाराचे डाव खेळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजोगलदरी (वाशिम): परिसरातील ग्रामीण भागांत गावातील चावडीच्या ठिकाणी खुलेआम पैशांवर जुगाराचे डाव खेळले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तरुण पीढी वाममार्गावर लागून भविष्य उद्ध्वस्त करीत असल्याचे दिसत असतानाही या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये ही बाब उघड झाली आहे.जिल्ह्यात अवैध दारूविक्री, वरली मटक्यांसह इतर अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत असताना ग्रामीण भागांत अगदी गावातील खुल्या जागेत बिनदिक्कत पत्त्याच्या जुगारांचे डाव खेळले जात असताना स्थानिक पोलीस प्रशासन आणि बिट जमादारांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून लोकमतच्यावतीने काही ठिकाणी स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यामध्ये काही तरूण मंडळी सर्रासपणे गावात पैशाने पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. दुपारी १२ वाजतापासून भरविला जाणारा पत्त्याच्या जुगाराचा डाव सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालत असल्याचेही यातून स्पष्ट झाले. जुगारात तरूण मंडळी नाहक वेळ आणि पैसे गमावून आपले भविष्य उद्ध्वस्त करीत असताना पोलीस प्रशासनाला हा प्रकार का दिसत नाही, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस