शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sting Operation : मतदान नोंदणी केंद्रांवर कर्मचारी अनुपस्थित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:06 IST

. रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर दुपारच्या सुमारास स्टिंग आॅपरेशन केले असता, या केंद्रावर कुणीही आढळून आले नाही तर काही केंद्र कुलूपबंद आढळून आली.

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार २८ जुलै रोजी मतदार नोंदणीकरीता विशेष मोहिम राबविण्यात आली. रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर दुपारच्या सुमारास स्टिंग आॅपरेशन केले असता, या केंद्रावर कुणीही आढळून आले नाही तर काही केंद्र कुलूपबंद आढळून आली.विशेष मतदान नोंदणी मोहिमेच्या दिवशी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. मोहिमेची अंमलबजावणी प्रभावी व्हावी याकरीता जिल्हाधिकारी व तहसिलदार मतदानकेंद्रांना भेटी देऊन पाहणी करतील, अशा सूचनाही कर्मचाऱ्यांना दिलेल्या होत्या. रिसोड शहर व ग्रामीण भागात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे किंवा नाही यासंदर्भात ‘लोकमत’ने २८ जुलै रोजी स्टिंग केले असता, अनेक मतदान केंद्रांवर धक्कादायक बाबी आढळून आल्या.रिसोड शहरातील केवळ दोन मतदान केंद्राचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व मतदान केंद्रावर कर्मचाºयांची अनुपस्थिती आढळून आली. भारत प्राथमिक मराठी शाळा तसेच नगर परिषद मुलांची मराठी शाळा या दोन केंद्रावर कर्मचारी आढळून आले.भारत माध्यमिक कन्या, शाळा भारत माध्यमिक विद्यालय, नगर परिषद उर्दू शाळा, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नगर परिषद प्राथमिक मराठी कन्या शाळा, अल्लामा इकबाल उर्दू हायस्कूल, बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय रिसोड आदी मतदान केंद्रांवर पाहणी केली असता, ही सर्व मतदान केंद्र बंद आढळून आले. त्यामुळे शहरातील नवमतदारांची गैरसोय झाली.दरम्यान, यासंदर्भात काही कर्मचाºयांना कुणकूण लागली असता, संबंधित केंद्रांवर बसण्यासाठी जागा नव्हती असे सांगून बचावात्मक पवित्रा घेतला. यामधील काही मतदान केंद्रावरील शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याशी संपर्क साधला असता, बसण्याची व्यवस्था आहे असे सांगून मतदान केंद्रावरील कर्मचाºयांनी आम्हाला तशा कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या, असे स्पष्ट केले. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी कर्मचारी आढळून आले नाहीत. विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व तहसिलदार राजेश सुरडकर यांनी रविवारी ग्रामीण भागात मतदान केंद्रांची पाहणी केली असता, अनेकजण गैरहजर आढळून आल्याची माहिती आहे.रविवार हा मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा शेवटचा दिवस असल्यामुळे संबंधित सर्व कर्मचाºयांनी मतदान केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर कर्मचारी गैरहजर राहणे तसेच मतदान केंद्र कुलूपबंद राहणे हा गंभीर प्रकार आहे. गैरहजर राहणाºया कर्मचाºयांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावण्यात येतील.- राजेश सुरडकर,तहसीलदार, रिसोड

टॅग्स :Risodरिसोडwashimवाशिम