शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Sting Operation : घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 15:18 IST

वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या माहितीवरुन ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान चक्क प्रवासी आॅटोंमधून गॅस-सिलिंडरची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस-सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या माहितीवरुन ‘लोकमत’ने शुक्रवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’दरम्यान चक्क प्रवासी आॅटोंमधून गॅस-सिलिंडरची वाहतूक होत असल्याचा गंभीर प्रकार निदर्शनास आला.संबंधित त्या-त्या कंपन्यांकडे टोल फ्री क्रमांकाव्दारे अथवा प्रत्यक्ष एजन्सी असलेल्या ठिकाणी जावून घरगुती ‘गॅस-सिलींडर’चा रितसर नंबर लावल्यास घरपोच सिलींडर पोहचविण्याची जबाबदारी त्या-त्या एजन्सीकडे असते. यासाठी १२ किलोमिटरच्या अंतरापर्यंत कुठलेही शुल्क आकारू नये, असा शासनाचा नियम आहे; परंतु सर्व कायदे-नियमांची मोडतोड करून ठराविक काही लोकांना वाशिममधील गॅस एजन्सी मागेल तेवढे सिलींडर पुरवत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. यासंदर्भात प्राप्त माहितीवरून ‘लोकमत’ने शुक्रवारी ‘स्टिंग आॅपरेशन’ केले असता एका निनावी क्रमांकाच्या आॅटोमध्ये घरगुती वापराच्या सिलींडरची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. दुसऱ्या एका प्रवासी आॅटोमध्ये ७ ते ८ सिलींडर ठेवून ग्रामीण भागात नेले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला.तथापि, जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये घरगुती वापराच्या गॅस-सिलींडरची बेकायदेशीर वाहतूक करणे हा दखलपात्र गुन्हा असतानाही संबंधित यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार वाशिमसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. ‘गॅस-सिलींडर’ची प्रवासी वाहनांमधून (अ‍ॅपे) वाहतूक करणे पूर्णत: चुकीचे आहे. एवढेच नव्हे; तर दुचाकी वाहनावरूनही ‘सिलींडर’ची वाहतूक करता येत नाही. मात्र, याऊपरही नागरिक धोका पत्करतात. हा प्रकार बंद करण्यासाठी तहसीलच्या पुरवठा विभागाकडून निश्चितपणे पुढाकार घेतला जाईल. प्रवासी वाहनांमधून गॅस-सिलींडरची वाहतूक यापुढेही सुरूच राहिल्यास चोख तपासणी करून संबंधितांविरूद्ध धडक कारवाईची मोहिम हाती घेण्यात येईल.- विजय सावळे, तहसीलदार, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCylinderगॅस सिलेंडर